किनवट तालुक्यातील 21 जलप्रकल्पांत 26.77 टक्के उपयुक्त जलसाठा ; गतवर्षी वार्षिक सरासरीच्या 136.24 टक्के पडला पाऊस - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 18 April 2023

किनवट तालुक्यातील 21 जलप्रकल्पांत 26.77 टक्के उपयुक्त जलसाठा ; गतवर्षी वार्षिक सरासरीच्या 136.24 टक्के पडला पाऊस


किनवट, दि.18,(प्रतिनिधी) :  किनवट तालुक्यातील एकूण 21 जलप्रकल्पांतील उपयुक्त जलसाठा 26.77 टक्क्यांवर आला असून, महत्वाच्या तीन मध्यम प्रकल्पांत 37.69 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांना बरीच ओढाताण करावी लागणार आहे.


    किनवट तालुक्यात नागझरी,लोणी व डोंगरगाव येथील तीन मध्यम प्रकल्प, सिरपूर व मांडवी येथील दोन बृहत लघु तलावाशिवाय इतर 13 लघु तलाव व 3 साठवण तलाव आहेत. तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 2020 पूर्वी 1 हजार 240 मी.मी. होते.  किनवट तालुक्याचे 01 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंतचे  सरासरी पर्जन्यमान 1 हजार 26.58 एवढे निश्चित केलेले आहे. राज्य शासनाच्या पर्जन्यमानाच्या पोर्टलवरील नोंदीनुसार गेल्या जून ते ऑक्टोबर दरम्यान किनवट तालुक्यात  पडलेला एकूण पाऊस  सरासरी 1450.60 मि.मी. आहे. जो की उपरोल्लेखित पर्जन्यमानाच्या 141.30 टक्के पाऊस झालेला आहे. एवढा मुबलक पाऊस झाल्यामुळे, रब्बी हंगामातील पिकांना या प्रकल्पांतील पाण्यामुळे बराच दिलासा मिळालेला आहे.


    आजमितीस ज्या मध्यम, बृहत व लघू प्रकल्पांसह साठवण तलावात प्रत्यक्ष उपयुक्त जलसाठा आहे, त्याची आकडेवारी दशलक्ष घनमिटर मध्ये पुढील प्रमाणे असून, कंसातील आकडे त्याची टक्केवारी दर्शवितात. नागझरी मध्यम प्रकल्प-2.712(41.31),लोणी मध्यम प्रकल्प-4.127 (49.24),डोंगरगाव मध्यम प्रकल्प-2.117(24.04),सिरपूर बृहत- 0.453 (10.84),मांडवी बृहत-2.414 (46.96), लघू प्रकल्प : कुपटी -  0.040(3.00), मूळझरा-0.603(33.25),थारा-0.459(53.21),निचपूर-1.030(46.85),जलधारा-0.835(44.72),सिंदगी-0.610(38.36), हुडी-0.737(47.11), पिंपळगाव(कि.)-1.531(70.65), नंदगाव-  0.121(8.14), अंबाडी-0.194(23.87),दरसांगवी-0.771(28.68),पिंपळगाव(भि.)-1.414(61.99),सावरगाव-0.399(30.44), निराळा सा.त.- 1.742(77.01),सिंदगी सा.त.-1.668(72.08), लक्कडकोट सा.त.-1.422(78.39).


गळती होणाऱ्या तलाव तसेच कॅनालच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांकडून जोरदार मागणी होत असल्याचे कळाले.  खरीप व रब्बी हंगामातील सिंचनासाठी लघुप्रकल्पातील पाणी वापरल्या जाते तर मध्यम प्रकल्पातील  पाणी खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तिन्ही हंगामातील पिकांसाठी पुरविल्या जाते.  निराळा, लक्कडकोट व सिंदगी येथील साठवण तलावामुळे भूगर्भातील पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होते व त्यातील पाणी जनावरांना पिण्यासाठी व नागरिकांना वापरण्यासाठी राखून ठेवल्या जाते. तसेच नागझरी मध्यम प्रकल्पातील 1.5 द.ल.घ.मि.पाणी उन्हाळ्यामध्ये किनवट शहराला नळयोजनेद्वारे पाणी पुरविण्यासाठी राखून ठेवल्या जात असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Pages