'युगप्रवर्तक डाॕ. आंबेडकर ' ग्रंथ प्रकाशन संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 19 April 2023

'युगप्रवर्तक डाॕ. आंबेडकर ' ग्रंथ प्रकाशन संपन्न

नागपूर ( प्रतिनिधी):

जेष्ठ आंबेडकरी विचारवंत, पँथर नेते प्रा. डॉ. अरुण कांबळे लिखित, 'युगप्रवर्तक डॉ. आंबेडकर ' या प्रबुद्ध प्रकाशन सोलापूरच्या वतीने काढण्यात आलेल्या ग्रंथाचे प्रकाशन भंते  नागाप्रकाश यांच्या हस्ते करण्यात  आले.  जरीपटका येथील हर्षवर्धन बुद्धविहारात प्रकाशन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रबुद्ध  रंगभूमीचे सल्लागार व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण अडिकणे हे उपस्थित होते. प्रबुद्ध रंगभूमी नागपूर व हर्षवर्धन बुद्ध विहार समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२ व्या जयंतीचे औचित्य साधून प्रबुद्ध भारत निर्मिती अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी अभिनेते, दिग्दर्शक डॉ. कीर्तिपाल  गायकवाड यांचा सत्कार भंते नागाप्रकाश यांचा हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत डॉ. कीर्तिपाल गायकवाड यांनी प्रा. अरुण कांबळे यांचा आंबेडकरी चळवळीतील  योगदानाची माहिती दिली.  कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून, भन्ते नागानंद , भन्ते धम्मदीप प्रबुद्ध नाट्य परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय सायरे , मैत्री इंडिया चॅनेलचे संपादक वामन सोमवुवर, अनिल राहुले, अनिताताई मडके आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी संजय सायरे यांनी भारतीय प्रबुद्ध सांस्कृतिक चळवळी विषयी व प्रा. अरुण  कांबळे सरांच्या कार्याविषयी माहीती दिली. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण अडीकणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पँथर चळवळीचा व पँथर कांबळेच्या लढवय्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॕ. किर्तिपाल गायकवाड यांनी केले तर आभार दिपाली धारगावे यांनी केले. No comments:

Post a Comment

Pages