न्यायमूर्ती सी.एल. थुल यांचे सहयोग नगर नांदेड येथे व्याख्यान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 16 April 2023

न्यायमूर्ती सी.एल. थुल यांचे सहयोग नगर नांदेड येथे व्याख्यान

   नांदेड (प्रतिनिधी) :

       महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती, जमाती आयोग माजी अध्यक्ष न्यायमूर्ती सी.एल.थुल यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सहयोग नगर नांदेड येथील मातोश्री रमामाता बौद्ध विहार येथे मंगळवारी सकाळी अकरा वाजता व्याख्यान आयोजित केले आहे. महाविहार परिवार नांदेड , रमामाता महिला मंडळ , बौद्ध विहार समिती ,  सहयोग नगर यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .तरी सदर कार्यक्रमाला परिसरातील बौद्ध बांधवांनी, विद्यार्थी कर्मचारी व आंबेडकरा अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविहार परिवार नांदेड तर्फे आयुष्यमान साहेबराव पुंडगे , इंजिनियर यशवंत गच्चे , बी.जी पवार, रमेश कोकरे, राजेश बि-हाडे, अशोक गोडबोले, एडव्होकेट भीमराव हाटकर, तसेच रमामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा उपासिका जयाताई सुर्यवंशी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages