संभाजीनगर :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी शहरातील प्रत्येक वाॅर्डात अभ्यासिका स्थापन करण्याची घोषणा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी शांतता समितीच्या बैठकीत सोमवारी केली. त्याविषयीची केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी सूचना केली होती.
तापडिया नाट्यमंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक आयोजित केली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीचे औचित्य साधून वाॅर्डा-वाॅर्डांत त्यांच्या नावाने १३२ अभ्यासिका उघडल्या पाहिजेत. अनेक मुलांना घरात अभ्यास करता येत नाही. त्यासाठी अभ्यासिकांची गरज आहे. या अभ्यासिकांसाठी पालकमंत्र्यांनी लक्ष घातले पाहिजे.
त्यावर उत्तर देताना पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी शहरातील ११५ वॉर्डांत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अभ्यासिका उघडण्याची घोषणा केली. तेव्हा उपस्थित आंबेडकरी समुदायाने जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला.
No comments:
Post a Comment