क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती किनवट शहर व परिसरात मोठ्या उत्साहात साजरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 11 April 2023

क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती किनवट शहर व परिसरात मोठ्या उत्साहात साजरी


किनवट,ता.११(बातमीदार): शहर व तालुका फुले-आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती आज(ता.११) शहरात व परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.जयंतीचा मुख्य सोहळा बस स्थानकाजवळील महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ सकाळी  ११ वाजता संपन्न झाला.उपस्थित मान्यवरांनी फुले दांपत्याच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले.


     यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष  अॅड.सम्राट सर्पे ,माजी नगराध्यक्ष  के.मुर्ती,माजी उपनगराध्यक्ष      श्रीनिवास नेम्मानिवार,सुरेश  जाधव, विनोद भरणे,माधव कावळे,अॅड.मिलिंद सर्पे, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार,  माजी नगरसेवक अभय महाजन,संदिप पेटकुले,विजय पोलासवार,अनिल तामगाडगे,प्रा.रविकांत सर्पे,अमिन चव्हाण,राजेश पाटील,सम्यक सर्पे,रवि कांबळे,रवि दिसलवार, सुबोध परेकार, विजेंद्र सर्पे,उत्तम कानिंदे,मारोती सुंकलवाड,दया पाटील,विवेक ओंकार,मल्हारी खामकर,अशोक वासाटे, शेषेराव पेटकुले,जय वर्मा, सुनिल पाटील, देशपांडे,प्रकाश बोदमवाड,प्रा.डाॅ.सागर शिल्लेवार,अजय कदम,बालाजी बामणे,प्रविण गायकवाड यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयुक्त जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता.

No comments:

Post a Comment

Pages