संभाजीनगर :
शहरात भिमजयंती हर्षोल्हासात साजरी करण्यात आली.दिवसभर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी भिमानुयायांनी एकच गर्दी केली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा शहरात जल्लोषात साजरी करण्यात आली.
13 एप्रिल च्या मध्यरात्री 12 वाजताच्या ठेक्याला आतिषबाजी करून पासूनच जल्लोषाला सुरुवात झाली.
सायंकाळी 6 वाजतापासून शहरातील वस्त्यांमधून मिरवणुका क्रांतिचौका कडे मार्गस्थ झाल्या.पांढरी वस्त्रे परिधान केलेले लाखो अनुयायांच्या गर्दीने क्रांती चौक ते सिटी हा चौक मार्ग भरून गेला होता.
हाती निळे व पंचशील ध्वज डोक्यावर बांधलेल्या निळ्या फेट्यांनी सर्वत्र निळाई पडल्याचे दिसत होते.
डीजेवरिल भीमगीतांवर तरुणाई थिरकत होती.शहरातील अनेक रस्त्यांवर मिरवणुका डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेले शेकडो भीमरथ या मिरवणुकीत जागोजागी सहभागी होत होते.मुख्य मिरवणूक मार्ग क्रांती चौक ते भडकलगेट असा होता. या मार्गावर आकाशवाणी ,पिरबाजार ,रेल्वेस्टेशन कडून अनेक भीमरथ येत होते.
खोकडपुऱ्यातुन अनेक भीमरथ मिरवणुकीत सहभागी झाले.पुढे भीमनगर ,भावसिंगपूरा ,घाटी कडून येणारे भीमरथ औरंगापुरा मार्गे येऊन गुलमंडी येथे सहभागी होत होते,तर शाहबाजारच्या दिशेने येणारे भीमरथ शाहगंज मार्गे सिटीचौकात मिरवणुकीत सहभागी झाले.
मिरवणूक मार्गावर दुतर्फा भीमशक्ती,रिपब्लिकन सेना, पंथर्स रिपब्लिकन पार्टी,संदीपभाऊ शिरसाट मित्रमंडळ,बोधिसत्व प्रतिष्ठान,भीम कायदा सामाजिक संघटना,भीमशक्ती,आंबेडकरवादी जयंती उत्सव समिती, सर्वपक्षीयआंबेडकरवादी जयंती उत्सव समिती, दि आंबेडकराईट मूव्हमेंट,बहुजन समाज पार्टी,वंचित बहुजन आघाडी,भारतीय दलित पँथर,अश्वमेघ क्रिडा मंडळ,पीपल्स रिपब्लिकन पार्टी,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)व इतर संघटनांनी भव्य व आकर्षक स्वागतमंच उभारले होते.
उत्सवास कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
सिटी चौक मार्गे मिरवणुका भडकलगेट पर्यंत पोहचल्यानंतर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीची सांगता झाली.
No comments:
Post a Comment