महात्मा फुले - डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव -१० ते १४ एप्रिल दरम्यान आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 11 April 2023

महात्मा फुले - डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव -१० ते १४ एप्रिल दरम्यान आयोजन

संभाजीनगर :

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने १० ते १४ एप्रिल दरम्यान महात्मा ज्योतीबा फुले जयंती ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती या काळात महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात १८ तास अभ्यास अभियान, कथाकथन, व्याख्यान, भीमगीते, मिरवणूक आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. 


   येत्या १० ते १४ एप्रिल या काळात मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी संयोजन समितीही स्थापन करण्यात आली आहे.  महोत्सवात पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत विद्यापीठ ग्रंथालयातील वाचन कक्षात सलग १८ तास अभ्यास अभियान होईल. समन्वयक डॉ.सुनिल नरवडे तर ग्रंथपाल डॉ. धर्मराज वीर संयोजन करणार आहेत. महोत्सवातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे : 

मंगळवारी सायंकाळी नाटयगृहात ’सावित्री तु होतीस म्हणुन’ या विषयावर डॉ.प्रतिभा जाधव यांचे कथाकथन . त्यानंतर सामाजिक परिवर्तनात महात्मा फुले यांच्या विचारांची प्रस्तूतता' या विषयावर अक्षय भाऊराव राऊत यांचे व्याख्यान . अध्यक्ष - कुलसचिव डॉ.भगवान साखळे, समन्वयक-अधिसभा सदस्य डॉ.उमाकांत राठोड बुधवारी रात्री ’डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय चलन’ या विषयावर  प्रा.व्ही.कृष्णा यांचे व्याख्यान 

अध्यक्ष -प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, समन्वयक - अधिसभा सदस्य डॉ.शंकर अंभोरे . गुरुवारी रात्री

’भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम’ सादरकर्ते - डॉ.गणेश चंदनशिवे आणि संच . शुक्रवारी (दि.१४ ) सकाळी विद्यापीठातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयापासून ते मुख्य नाटयगृहापर्यंत रॅली . त्यानंतर

विशेष व्याख्यान - ’डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार आणि कार्य' या विषयावर प्रा.एम.आर कांबळे (सोलापूर) यांचे व्याख्यान .

अध्यक्ष - कुलगुरु डॉ.प्रमोद येवले

प्रमुख उपस्थिती - प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ . समन्वयक - डॉ.वाल्मिक सरवदे (अधिष्ठाता ) 

या सोहळ्याच्या संयोजन समितीत

डॉ.वाल्मिक सरवदे, कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड, डॉ.सतिश दांडगे, प्रा.सुनिल मगरे, डॉ.शंकर अंभोरे, डॉ.उमाकांत राठोड, डॉ.पुरुषोत्तम देशमुख, डॉ.संजय मुन, डॉ.आनंद देशमुख यांचा समावेश आहे. या संपूर्ण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ.भगवान साखळे व संचालक डॉ.मुस्तजीब खान यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages