भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन शांततेत करा निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे यांचे आवाहन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 12 April 2023

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन शांततेत करा निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे यांचे आवाहन

नांदेड दि.१२-भगवान गौतम बुद्ध यांनी जगाला शांततेचा संदेश दिला आहे त्यांचा आदर्श उराशी बाळगून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत आणि साध्या सोप्या पद्धतीने साजरी करावी असे आवाहन निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी आणि राज्य शासनाच्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारप्राप्त रामचंद्र देठे यांनी केले आहे.


भीम जयंती वर्षातील एक महोत्सव असतो.यानिमित्त आयोजित करण्यात येत असलेले उपक्रम सर्व‌ समाजाला योग्य मार्गदर्शनाची दिशा दाखविणारे असावेत. शासकीय 

शांतता समितीच्या  बैठकीत दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

जयंती दिवशी पंचशील ध्वज फडकवावा.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अथवा प्रतिमेस ताज्या फुलांचा हार घालावा. बौद्धाचार्य अथवा भंतेजी यांनी बुद्ध वंदना घ्यावी आणि ती सर्वानी अनुपालनात श्रवण करावी.महिला मंडळ आणि बाल मंडळ यांच्या आसन व्यवस्थेस भीम जयंती मंडळाने प्राधान्य द्यावे.उपस्थित मान्यवर आणि तज्ञांच्या भाषणाचा कार्यक्रम थोडक्यात घ्यावा.वस्ती व नगरातील उदयोन्मुख मुलामुलींना भाषणाची संधी द्यावी.त्यांच्यातील गायन वादन लेखन कलाकौशल्य अशा विविध सुप्त गुणांना उजागर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे. सार्वजनिक मिरवणूक शांततेत काढावी जेथे वाद शक्यता आहे तेथे माघार घ्यावी यातच बुद्ध तत्त्वज्ञान दडले आहे हे जगाला दाखवून द्दावे. लावूडस्पिकरचा आवाज कमीच ठेवावा.पोलिसांनी दिलेली कालमर्यादा पाळावी.असेही रामचंद्र देठे ‌यांनी आपल्या आवाहनात नमूद केले आहे.

भीम जयंती म्हणजे वेडे वाकडे नाचणं गाणं नव्हे तर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांची जयंती महाशक्ती अमेरिकेने नाॅलेज डे म्हणून साजरी करण्याच्या उपक्रमाचा आणि भारतदेशाने भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान दिला त्याचा सन्मान राखणे हा आहे.

यादिवशी अनाथ, अपंग,निराधार,अबला, परित्यक्ता विधवा विधूर अशांना शक्य असल्यास आर्थिक दान करा. नगर,ग्राम स्वच्छता अभियान सुरू करा.गावातील तंटे मिटवा. आपण सर्व बंधूभाऊ असा बंधूभाव रूजवा.शासन-प्रशासनाला सहकार्य करा.सशक्त भारत उभा करा असेही निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे यांनी कळकळीचे आवाहन केले आहे.

         

No comments:

Post a Comment

Pages