सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर किनवटला फटाक्याची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 11 May 2023

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर किनवटला फटाक्याची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा

 किनवट, दि. ११ (प्रतिनिधी) राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे - फडणवीस सरकारने सत्ता स्थापन केली. तेव्हा पासून १६ आमदारांचा अपात्रतेचा मुद्दा गाजत होता. प्रकरण मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर मा. उच्च न्यायालयाने देखील दोन्ही पक्षांकडील युक्तिवाद एकुण निकाल राखीव ठेवण्यात आला होता. अखेर गुरुवारी (दि.११) शिंदे गटाला दिलासा देणारा निर्णय दिल्याने राज्यभरासह खासदार हेमंत पाटील समर्थक आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे, भाजप तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, भाजप जिल्हाउपाध्यक्ष अशोक नेमानिवार,शिवसेना शहर प्रमुख सुरज सातुरवार, भाजप शहराध्यक्ष श्रीनिवास नेमानिवार,  माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, किनवट पंस सभापती दत्ता आडे, भाजप ज्येष्ठ नेते शिवराज राघूमामा, संतोष चनमवार,मनोज तिरमनवार, स्वागत आयनेनिवार, नगरसेवक शिवा आंधळे व  बालाजी धोतरे, सुरेश घुमडवार,शेख मोहसीन, शेख अजीज, हौसाजी काकडे, शेख शाहरुख, साई पालेपवाड,विक्रांत दग्गुलवार,सय्यद बबलू, सुनिल राठोड, साई उत्तरवार, किरण येरमे, खासदार  हेमंत पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड सह आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages