नांदेड दि. 11 -
स्वराज्य संकल्प अभियान गाव तेथे शाखा आणि घर तिथे मावळा या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे हे हदगाव हिमायतनगर दौर्यावर आले होते.
दरम्यान तामसा सर्कलमध्ये अनेक गावात शाखा स्थापन केल्यानंतर सायंकाळी तामसा येथे सभेदरम्यान संभाजी राजे म्हणाले, शेतकर्यांच्या समस्या कोणालाही सोडविता आल्या नाहीत. बाजूच्या राज्यात 24 तास वीज आहे. पण आपल्याकडे काय परिस्थती आहे. आजही मोठ्या प्रमाणात शेतकरी अस्वस्थ आहेत. हे कुठे बदलायचे असेल तर स्वराज्य शिवाय पर्याय नाही. याचवेळी स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माधव देवसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना छत्रपती संभाजी राजे यांनी माधव देवसरकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत महाराष्ट्रातील स्वराज्य पक्षाची पहिली उमेदवारी जाहीर करत कुठल्याही विधानसभा मधून निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू करण्याचे सांगत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
संभाजी राजे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन राजकीय पर्याय देण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना केली. संघटन मजबूत करण्यासाठी गाव तेथे शाखा उघडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात माधव पाटील देवसरकर यांच्या पुढाकारातून ही चळवळ अधिक गतिमान केली जात आहे. हिमायतनगर आणि हदगाव तालुक्यातील शाखांचे अनावरण करण्यात आले.
तामसा येथील सभेत करण गायकर, धनंजय जाधव, रघुनाथ चित्रे, आप्पासाहेब कुडेकर, मंगेश कदम, राहुल शिंदे, संजय पवार आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. सभा यशस्वीतेसाठी परिश्रम घेणारे गजानन सोळंके, तिरुपती भगणुरे, सदानंद पुयड, बालाजी कराळे, नवदीप वानखेडे, बाबुराव वानखेडे, विश्वजीत पवार, पवन मोरे, कृष्णा गिरामकर, अवधूत पवार, श्रीनिवास कवळे व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment