प्राचार्य डॉ शंकर अंभोरे यांची कोहिनूर कला,वाणिज्य विज्ञान महाविद्यालय खुलताबाद च्या प्राचार्यपदी नियुक्ती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 22 May 2023

प्राचार्य डॉ शंकर अंभोरे यांची कोहिनूर कला,वाणिज्य विज्ञान महाविद्यालय खुलताबाद च्या प्राचार्यपदी नियुक्ती

औरंगाबाद :

शैक्षणिक तसेच सामाजिक चळवळीत गेल्या ३० वर्षांपासून प्राध्यापक,शिक्षक,विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत असणारे,शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा प्रस्थापितांना जाब विचारून न्यायालयीन लढा उभारणारे आंबेडकरी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते डॉ शंकर अंभोरे यांची नुकतीच कोहिनुर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या प्रचार्यपदी नियुक्ती झाली आहे.त्याधी दानकुवर महिला महाविद्यालय,जालना येथे अर्थशात्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे संशोधक मार्गदर्शक असून त्यांच्याकडे १ पोस्ट डॉक्टरेट तसेच २० विद्यार्थी विद्यार्थिनी पिएच डी अवॉर्ड झाले असून ५ विद्यार्थ्यांचे संशोधन कार्य सुरू आहे.त्यांचे आतापर्यंत ६० आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय परिषदेत सहभागी होऊन रिसर्च पेपर विविध जर्नल मध्ये प्रकाशित झाले आहेत.जवळपास ५ जर्नल चे संपादक आहेत.त्यांची अर्थशास्त्र विषयाची ११ ग्रंथ प्रकाशित झाली आहेत.तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाचे ३ मेजर प्रोजेक्ट आणि २ मायनर प्रोजेक्ट पूर्ण केली आहेत.याच बरोबर दोन परदेशी अभ्यास दौरे केली आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अर्थशात्र विषयाच्या अभ्यास मंडळावर कार्यरत असण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. तसेच तीन वेळेस व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष तसेच चालू शैक्षणिक वर्षातील अधिसभा सदस्य म्हणून कार्यरत आहेत.स्वाभिमानी मुप्टा संघटनेच्या माध्यमातून गेल्या ३० वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात आपला आंबेडकरी बाणा जागृत ठेवण्यासाठी कार्यरत आहेत.यांच्या अध्यापन आणि संशोधन तसेच आंबेडकरी चळवळीतील प्रदिर्घ कार्याची योग्य दखल घेतली गेली अशी चर्चा सामाजिक वर्तुळात होत आहे.

त्यांच्या नियुक्ती बद्दल संस्थेचे अध्यक्ष मझहर खान,प्राचार्य डॉ किशोर साळवे,डॉ उमाकांत राठोड,डॉ दादासाहेब गजहन्स,प्राचार्य प्रमोद हेरोडे,प्राचार्य मधुकर चाटसे,डॉ बाळासाहेब लिहिणार,डॉ विजय बैसाने,डॉ अनिल पांडे,डॉ ज्ञानेश्वर माणेराव,डॉ युवराज धबडगे,डॉ सुशील बोर्डे,डॉ सतिश ढोके,ऍड विजय सुरडकर,प्रा विलास पांडे,प्रा देवानंद वानखडे,डॉ राहुल तायडे, डॉ प्रेमराज वाघमारे,डॉ संजय सांगवीकर, डॉ सागर चक्रनारायण,सतीश दवणे,गुणरत्न सोनवणे,शिलवंत गोपनारायण आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Pages