पुस्तक प्रकाशन व शिक्षण क्रांती राष्ट्रीय अभियाना निमित्त दीपक कदम आंबेडकरवादी मिशन प्रमुख यांचे व्याख्यान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 18 May 2023

पुस्तक प्रकाशन व शिक्षण क्रांती राष्ट्रीय अभियाना निमित्त दीपक कदम आंबेडकरवादी मिशन प्रमुख यांचे व्याख्यान


नांदेड :

जयवर्धन भोसीकर

डॉ.यशवंत चव्हाण व डॉ. अरिया सुयश चव्हाण यांनी लिहिलेले 'थर्टी डेज इन म्युनिक' या ग्रंथाचे प्रकाशन 21 मे रोजी रविवारी सकाळी दहा वाजता बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे संपन्न होणार आहे.

यावेळी सिद्धजीराव बाबजी पाटील चव्हाण यांच्या स्मरणार्थ व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. पहिल्याच वर्षी व्याख्यानमालेत दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन हे शिक्षण क्रांती राष्ट्रीय अभियान या विषयावर व्याख्यान देतील.

या कार्यक्रमास डॉ. उद्धवराव भोसले कुलगुरू स्वाराती महा विद्यापीठ नांदेड, शशिकांत महावरकर विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र ,अभिजीत राऊत जिल्हाधिकारी नांदेड, श्रीकृष्ण कोकाटे जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड, सोमेय मुंडे पोलीस अधीक्षक लातूर, अविनाश कुमार अतिरिक्त पोलीस अधीक्षक नांदेड, एकनाथ उर्फ अनिल मोरे माजी सचिव तथा अध्यक्ष लश्यवेध फाउंडेशन, डॉ  गोविंद नांदेड माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास विद्यार्थी तरुण बुद्धिजीवी नि मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे अशी विनंती डॉ.सविता यशवंत चव्हाण, निर्मल प्रकाशन व लक्ष्य वेध फाउंडेशन यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Pages