जयवर्धन भोसीकर
उमरी:- तालुक्यातील कृषी क्षेत्रात अग्रेसर राहुन कर्तबगार समाजसेवा करणाऱ्या कवडीकर व देवके यांच्या उत्कृष्ट कार्याची पोलिस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य यांनी दखल घेत उमरी तालुका अध्यक्ष किशोर कवडीकर तर उपाध्यक्ष पदी श्री बालाजी देवके यांची निवड केली आहे हि निवड संस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा अध्यक्ष माणिकराव अन्नपूर्णे साहेब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देउन किशोर कवडीकर व बालाजी देवके यांची निवड करण्यात आली या निवडीमुळे त्यांच्यावर संपूर्ण तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.महाराष्ट्र 24 मराठी न्यूज च्या प्रतिनिधीशी नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष बोलताना म्हणाले की पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहु व उमरी येथे नवीन पोलिस स्टेशनची इमारत बांधकाम चालू असुन त्या ठिकाणी पोलिस बांधवांच्या निवासस्थानी साठी आम्ही प्रयत्न करु असेही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment