नांदेड :
शासकीय वैद्यकीय परिचर्या प्रशिक्षण केंद्र नांदेड येथे शिकत असलेल्या प्रजापती लांडगे या मुलीला ताप आला होता, त्यामुळे तिने प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख यांच्या कडे सुट्टी साठी मागणी केली... पण प्रमुखांनी सुट्टी दिली नाही, त्यामुळे तिने तेथीलच त्यांच्याच शासकीय रुग्णालयात स्वतः पायीपायी चालत उपचार घेण्यासाठी गेली असता तेथील शिकाऊ डॉक्टर ने चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे तिला उलट्या झाल्या व उलटी घश्यात अडकून तिचा मृत्यू झाला.
सरकार डॉक्टर लोकांना एवढा भरमसाठ पगार देऊन पण डॉक्टर लोक शिकाऊ डॉक्टरांना रुग्णालयात ठेऊन घरी बायका लेकरांन सोबत मौजमजा करण्यासाठी व बाहेरील खाजगी क्लिनिक चालवण्यासाठी जातात त्यामुळे अश्या निष्पाप जीवांचा बळी जातो, हे कुठ तरी थांबायला हवे व ज्या डॉक्टर च्या हलगर्जीमुळे बळी गेला त्या डॉक्टर सहित सर्व स्टाफ वरती व तब्बेत ठीक नसतांना पण सुट्टी न देणाऱ्या प्रशिक्षण केंद्र प्रमुख यांच्या वरती 302 प्रमाणे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व त्या गरीब निष्पाप मुलीस न्याय द्यावा - अमोल महीपाळे
No comments:
Post a Comment