मांडवी- येथील जिल्हा परिषद हायस्कूल मधील 1996 या वर्षातील इयत्ता दहावीच्या वर्ग मित्रांचा तब्बल 26 वर्षानंतर मांडवी येथे 20 मे रोजी (गेट टुगेदर ) स्नेह मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी.बी. जाधव सर तर प्रमुख पाहुणे म्हणून मांडन सर, राजदार पठाण सर, रामलाल राठोड(शालेय शिक्षण समिती अध्यक्ष) व प्राचार्य डॉ.राजू मोतेराव सर मंचावर उपस्थित होते.
सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
यानंतर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.तदनंतर शाळेतील हयात नसलेले शिक्षक व वर्गमित्र यांना श्रद्धांजलीपर कार्यक्रम घेण्यात आला. 1996 या कालावधीत दहावीचे शिक्षण घेऊन आपापल्या कार्यक्षेत्रात रमलेले मित्र आज अनेक वर्षांनी एकमेकांना भेटून मनमोकळेपणाने संवाद साधला.
सोबतच सर्व मित्र परिवार आपला परिचय करून देऊन मनोगत व्यक्त करून आपल्या अंगी असणाऱ्या कलागुणांचे दालन मोकळे केले. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय समारोप करून राष्ट्रगीताद्वारे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद नीलकंठवार, श्याम डोंगरे व श्याम जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन ऍड. दिलीप काळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी साठी नरेंद्र राठोड, नरेंद्र सिंगडवार,पोचन्ना आटलावार, विकास आडे यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक कार्य केले असे या शाळेतील माजी विद्यार्थी तथा प्रज्ञा प्रतिष्ठान अध्यापक महाविद्यालय नांदेडचे प्राचार्य डॉ. राजू मोतेराव, संदीप चव्हाण , विजय पाईकराव, सुनील जाधव, संजय राठोड, श्रीनिवास, विजया कुरेवार, रिता राठोड, संजीवनी राठोड, गीता मोहरे, कविता सकवान, सिमा मुंडावरे, रंजना बंम्पलवार व इतर माजी विद्यार्थी यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment