व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 21 May 2023

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

नांदेड प्रतिनिधी:-  व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड  जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच याबाबतचे नियुक्तीपत्र मुखेड मतदार संघाचे आमदार डॉ.तुषार राठोड, व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड ,महानगर अध्यक्ष डॉ गणेश जोशी यांच्या हस्ते देण्यात आले. 


यशपाल भोसले हे मागील सात  वर्षांपासून पत्रकारिता करत आहेत. सध्या ते देशातील लोकप्रिय डेलीहंट या डिजिटल संस्थेत कार्यरत आहेत. व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि डिजीटल मीडिया विभागाचे  प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड यांनी विश्वास दर्शवत संघटना बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच संघटनेची ध्येय धोरने पत्रकारांपर्यंत पोहचविण्यासाठी यशपाल भोसले यांची व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड  जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यशपाल भोसले  यांनी संघटनेच्या सर्वच मान्यवर, पदाधिकारी यांचे आभार मानले असून जिल्ह्यात संघटना बळकटीकरण व मजबूत करण्याकरिता संघटनेची ध्येय धोरणे जिल्ह्यातील डिजिटल मिडिया कार्यरत पत्रकारांपर्यंत पोहचविण्याचे काम करू असे आश्वस्त केले आहे. त्यांच्या निवडीने सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

Pages