अक्षय भालेरावच्या मारेऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी ; किनवट शहरातील युवकांच्या वतीने मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 7 June 2023

अक्षय भालेरावच्या मारेऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी ; किनवट शहरातील युवकांच्या वतीने मागणी

किनवट : नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावातील बौध्द तरुण अक्षय भालेराव यांची जातीय द्वेषातून गावातील जातीयवादी लोकांनी अमानुषपणे हत्या केली. या काळीमा फासणाऱ्या घटनेचा किनवट शहरात बौध्द बांधव व युवकांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येवून अमानुषपणे हत्या करणाऱ्या जातीयवादी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीचे निवेदन सहायक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनास देण्यात आले. नायब तहसीलदार यांनी हे निवेदन स्विकारले.

निवेदनापूर्वी पीरिपाचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते आपल्या मनोगतात म्हणाले की, यातील दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी वरीष्ठ स्तरावर संघर्ष करू. बौध्द समाजाला शक्ती दाखविण्याची वेळ आली आहे. या आधीही अशी अनेक जातीयवादी प्रकरणे घडली आहेत. यामुळे आंबेडकरी जनत आता गप्प बसणार नाही. अक्षय भालेराव यास न्याय न मिळाल्यास यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने, मोर्चे करण्यात येणार असल्याच त्यांनी सांगीतले.

निवेदनात नमूद करण्यात आले की, या खुन प्रकरणात सक्षम अधिकारी नेमण्यात यावा, अक्षय भालेराव हा युवक अल्पसंख्यांक बौध्द प्रवर्गातील असल्याने हे खुन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून अतिजलद निकाल देण्यात यावा, या प्रकरणात प्रामाणिक व अभ्यासू सरकारी वकील नेमण्यात यावा, युवकाच्या कुटूंबातील सर्व व्यक्ती व साक्षीदारांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, पीडित कुटूंबाला तात्काळ १ कोटी रुपयांची तात्काळ मदत करण्यात यावी, कुटूंबातील एका व्यक्तीस तात्काळ शासकीय नौकरी देण्यात यावी, गुन्ह्यातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासह इतर मागण्या या निवेदनात होत्या. शासनाने या गंभीर हत्याकांड प्रकरणात हस्तक्षेप करून आरोपींना फाशीची शिक्षा देवून लवकरात लवकर अक्षय भालेराव यास न्याय देण्याचे काम करावे, अशीही मागणी करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Pages