डी. पी.सावंत , मंगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त नेरली कुष्ठधाम येथे अन्नदान ,दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 30 June 2023

डी. पी.सावंत , मंगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त नेरली कुष्ठधाम येथे अन्नदान ,दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

  जयवर्धन  भोसीकर 

नांदेड :

राज्याचे माजी मंत्री तथा माजी पालकमंत्री डी.पी.सावंत व काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष मंगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मंगेश कदम मित्र मंडळाच्यावतीने 1जुलै रोजी नेरली कुष्ठधाम येथे कुष्ठरोगी ,मतिमंद व काबरानगर येथील दिव्यांग विद्यार्थी तसेच आरायजिंग पब्लिक स्कूल तुळजाभवानी नगर येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे.


राज्याचे माजी राज्य मंत्री डी.पी.सावंत व काँग्रेस अनु.जाती विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष मंगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मंगेश कदम मित्र मंडळाच्या वतीने नेरली.कुष्ठधाम येथील कुष्ठरोगी,मतिमंद व्यक्तींना 12 वाजता अन्नदान व काबरानगर येथे 1 वाजता छत्रपती शाहू महाराज निवासी अपंग विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना माजी नगरसेविका स्मृतिशेष गंगाबाई नारायणराव कदम  यांच्या स्मरणार्थ गरम पाण्याचे गिजर, शैक्षणिक साहित्य व अन्नदान तसेच तुळजा भवानी नगर तरोडा (बू) येथील आरायजिंग पब्लिक इंग्लिश स्कूलमध्ये 11 वाजता शालेय पुस्तके वाटप करण्यात येणार आहेत.या समाजउपयोगी  कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन महेंद्र गायकवाड,अँड.धम्मपाल कदम,विकिभाऊ वाघमारे,विक्की गायकवाड,अरविंद सरपाते,आकाश कदम,नागेश कांबळे,प्रवीण वाघमारे यांच्यासह मंगेश कदम मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंगेश कदम मित्र मंडळाच्यावतीने विविध सामाजिक व समाज उपयोगी कार्यकम घेण्यात येतात.

No comments:

Post a Comment

Pages