नवी दिल्ली, 26 : सामाजिक समतेचे प्रणेते राजर्षि शाहू महाराज यांची जयंती उभय महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आज साजरी करण्यात आली.
कस्तुरबा गांधीस्थित महाराष्ट्र सदनच्या दर्शनी भागात राजर्षि शाहू महाराज यांच्या पुतळ्यास तसेच कॉपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनच्या सभागृहात शाहू महाराजांच्या प्रतिमेस प्रभारी निवासी आयुक्त नीवा जैन यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्राचे माजी मंत्री तसेच माजी खासदार, श्री हुसेन दलवाई यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. सहायक निवासी आयुक्त राजेश आडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कर्मचा-यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र परिचय केंद्रात राजर्षि शाहू महाराजांना अभिवादन
सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरूष, राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची जयंती महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी राजर्षि शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांनी यावेळी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
No comments:
Post a Comment