नांदेड : बहुजन युथ पँथर नांदेड आयोजीत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वंचीतचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर , भटके विमुक्त नेते देविदास हादवे, रिपब्लिकन सेना संदीप मांजरमकर यांची उपस्थिती होती. छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले व त्यांचा शुभहस्ते निळा व पंचरंगी ध्वज दाखवून मिरवणुकीची सुरूवात झाली. याप्रसंगी उपस्थित असलेल्या भटक्या विमुक्त जाती जमाती बांधवांनी आपल्या वेषभूष ने सर्व जनतेचे लक्ष वेधून घेतले. हि मिरवणूक पारंपरिक वाद्य वाजवून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी विक्रांत बिऱ्हाडे, सूर्यकांत पाटोळे, अमोल धमसे,सचिन खंडेलोटे, सागर ससाणे आनंद पाटील आदीनी परिश्रम घेतले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन बहुजन युथ पँथरचे जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्तरे यांनी केले आहे. या जयंती सोहळयात मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment