नांदेड ( प्रतिनिधी ) येथील महात्मा फुले हायस्कूल नाईक नगर नांदेड शाळेत " धार्मिक कर्मकांडे म्हणजे धर्म नसून माणसाने माणसाशी मनुष्यत्वाच्या आणि बंधुत्वाच्या भावनेने वर्तन ठेवणे म्हणजे धर्म". अशी शिकवण देणारा माणसातला राजा राजातला माणूस रयतेचा राजा,लोकराजा राजर्षी शाहूमहाराज यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री भारत माधवराव कलवले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक एन.पी.केंद्रे,ज्येष्ठ समाजसेवक श्री. राजू पाटील चिंचाळकर,मारोतराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम राजा छत्रपती शाहूमहाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. राजर्षी शाहूमहाराज यांनी संपुर्ण आयुष्यभर उपेक्षित व वंचित घटकातील माणसासाठी लढाई करून सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचे सामाजिक कार्य केले म्हणून महाराष्ट्र शासनाकडून जयंतीनिमित्त २६ जून सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो असे प्रतिपादन श्री भारत कलवले यांनी केले.शाळेतील सहशिक्षक श्री.एम. एन.गुंटूरकर सर यांनी आपले विचारव्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री व्ही.एम.खवास पाटील सर यांनी केले उपस्थितांचे आभार प्रदर्शन एस.एस.सुंदाळे यांनी मानले
Wednesday, 28 June 2023

महात्मा फुले हायस्कूल नाईकनगर येथील शाळेत सामाजिक न्याय दिन निमित्त कार्यक्रम
Tags
# जिल्हा
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment