औरंगाबाद:येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( सचिन खरात ) पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री यांना विभागीय आयुक्त कार्यालय मार्फत तक्रारी निवेदन देण्यात आले. संभाजी भिडे हे महाराष्ट्रात राहून सतत वादग्रस्त विधाने करून व घाणेरडे वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करत असतात . परंतु अद्याप प्रशासनामार्फत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली दिसून येत नाही. असे असताना संभाजी भिडे यांनी भारत देशाच्या स्वातंत्र्य विषयी, राष्ट्रगीता विषयी तसेच स्वातंत्र्यसाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकां विरोधी वादग्रस्त विधान केल्याने सर्व भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. व संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( खरात ) पक्ष जाहीर निषेध करत असून भारतीय संविधनानुसार लिहिलेल्या देशद्रोहाच्या कलामानुसार संभाजी भिडे यांच्या वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी या करीता मागणी करण्यात आली. निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश सचिव गणेश साळवे, मराठवाडा प्रभारी मनोज शेजवळ शहर अध्यक्ष आदित्य बिपिन वाहुळ महिला जिल्हाध्यक्ष कांता ताई अहिरे , इफ्तेकार काजी व अजय राजपूत यांच्या सह्या आहेत.
Wednesday, 28 June 2023
संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी
Tags
# मराठवाडा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
मराठवाडा
Labels:
मराठवाडा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment