पोलिसांकडून हातभट्टी दारूचे दोन अड्डे उध्वस्त ; एक लाख रुपयाचे साहित्य जप्त - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 28 June 2023

पोलिसांकडून हातभट्टी दारूचे दोन अड्डे उध्वस्त ; एक लाख रुपयाचे साहित्य जप्त


किनवट,दि.28(प्रतिनिधी): किनवट पोलिस ठाणे हद्दीतील भुलजा शिवारात रविवारी पोलिसांनी धाड टाकून एक लाख 10 हजार रुपयांची हातभट्टीची दारु आणि साहित्य जप्त केले आहे.


      भुलजा शिवारात एका शेतात मोह फुलाची गावठी दारू मोठ्या प्रमाणात काढण्यात येत असल्याची गोपनीय माहिती किनवट पोलिसांना समजली. त्या आधारे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रजून दोन अड्ड्यावर धाड टाकली. नारायण पाचू येरवाळ याच्या शेतात आरोपी रामदास जालमसिंग येरवाळ रा. लहान बोधडी आणि शिलाबाई प्रकाश कटारे रा.बोधडी खु. ता. किनवट याच्याकडून रसायन मिश्रीत हातभट्टीची दारू असलेल्या दहा टाक्या जप्त करण्यात आल्या. त्यांची किंमत सुमारे 01 लाख 10 हजार रुपये आहे. पो.कॉ. ज्ञानोबा लोकरे यांच्या फिर्यादीवरुन महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम एक 949,65 (इ),(ब),(फ) अन्वये किनवट ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी अशी दारू काढण्याबाबत माहिती दिली तर त्यांचे नाव गुप्त ठेवून संबंधीतांवर कारवाई केली जाईल असे पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांनी सांगितले. सदर दारू अड्डे नष्ट करण्याच्या कार्यवाहीमध्ये पो.कॉ.प्रकाश बोधमवाड, दिगांबर लखुळे, ज्ञानेश्वर डुकरे, तुकाराम वाडगुरे, गजानन लोकरे, शिवानंद रापतवार यांचा सहभाग होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारु काढली जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी कुठल्या कुंभकर्णी झोपेत होते? असा सवाल केला जात आहे.

No comments:

Post a Comment

Pages