"जीवनदीप महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा" : सुकन्या चौधरीची पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 12 July 2023

"जीवनदीप महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा" : सुकन्या चौधरीची पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती

          कल्याण : तालुक्यातील ग्रामीण भागात गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालय क्रीडा पासून ते स्पर्धा परीक्षेपर्यंत नेहमीच पुढे असलेले या महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील २०१८ मध्ये एम कॉम या विषयातून उत्तीर्ण झालेली,पोटगाव.ता मुरबाड येथील विद्यार्थीनी सुकन्या पुंडलिक चौधरी ची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक या पदावर नियुक्ती झाली आहे.विविध अकॅडमी, क्लासेस, अभ्यासिकेतील सातत्य व अध्ययनाच्या बळावर तिने हे यश संपादन केले आहे.या पूर्वी ही पोलीस आयुक्तालय ठाणे येथे कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत होती.तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयात शुभेच्छाचा वर्षाव होत असून जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे,संचालक प्रशांत घोडविंदे,प्राचार्य के. बी.कोरे, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे तसेच महाविद्यालयातील संचालक मंडळ, प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.

No comments:

Post a Comment

Pages