नांदेड :
संभाजी भिडेंच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, यां मागणीचे निवेदन भीम प्रहारच्या वतीने पोलीस अधीक्षक मा.कोकाटे यांना देण्यात आले.
तिरंगाध्वज हा राष्ट्रध्वज नाही,जण गण मन आपले राष्ट्रगीत नाही, १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन नाही, असे वक्तव्य करणाऱ्या मनोहर उर्फ संभाजी भिडेंनी भारताचा अवमान केला आहे. त्यामुळे माझ्या भावना दुखावल्या असल्याची तक्रार विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये भीम प्रहारचे प्रधान सचिव अमोल महिपाळे यांनी दिली.
भीम प्रहारचे प्रधान सचिव अमोल महिपाळे यांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीची दाखल पोलीस निरीक्षक यांनी घेतली नाही.
बुधवारी, रात्री ८ वाजता भीम प्रहारचे जिल्हाअध्यक्ष दीपक पवळे,प्रधान सचिव अमोल महिपाळे, सचिव प्रमोद वैद्य व श्याम निलंगेकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मा.कोकाटे यांची भेट घेऊन भिडे यांचे सर्व कारनामे निदर्शनास आणून दिले.
संभाजी भिडेंच्या विरोधात विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजेत, या मागणीसाठी आंदोलन करण्यात येईल असा इशारा भीम प्रहारचे प्रधान सचिव अमोल महिपाळे यांनी दिला आहे..
No comments:
Post a Comment