आपल्या अफाट अष्टपैलू अभिनयाच्या गुणांवर कायमस्वरूपी ठसा उमटवलेला गंभीर प्रवृतीचे अभिनेते म्हणजेच निळू फुले...
निळू फुले यांनी 'कथा अकलेच्या कांद्याची' या लोकनाट्याद्वारे रंगमंचावर पदार्पण केलं ... 'एक गाव बारा भानगडी' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि सलग ४० वर्षे या चित्रपटसृष्टीत तसेच रंगभूमीवर कारकीर्द गाजवली ...
अनंत माने दिग्दर्शित ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटातील झेले अण्णांच्या भूमिकेनं त्यांना चित्रपट व्यवसायात ओळख मिळवून दिली... निळू फुले यांनी बारा हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या ... तर मराठीतील जवळपास १४० चित्रपटांमधून काम केलं आहे...
निळू फुले यांची नाट्य अभिनयातील आठवणीत राहणारी होती ... सखाराम बाईंडर, जंगली कबूतर, सूर्यास्त, बेबी या नाटकांतील त्यांचा अभिनय विशेष उल्लेखनीय होता ... चित्रपटातील त्यांची वाटचाल खूपच मोठी आहे ... सामना, शापित, सोबती, पुढचं पाऊल, सिंहासन, भुजंग आशा कितीतरी चित्रपटातील त्यांच्या भूमिकांनी मराठी प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य केलं ...
व्यावसायिक गरज म्हणून काही चित्रपट स्वीकारणे त्यांना भाग पडते होते ... त्याही चित्रपटातील भूमिकांना त्यांनी समर्थपणे न्याय दिला... हिंदी भाषेतील निर्माणत्यांशी जुळवून घेता न आल्यानं आपण तेथे फार रमलो नाही असे ते म्हणतं ... ‘कुली’ चित्रपटात त्यांनी साकारलेली अमिताभच्या वडिलांची भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली आहे ... इतरही काही हिंदी चित्रपटातून त्यानी भूमिका साकारल्या अन त्या अभिनयाच्या जोरावर अजरामर केल्या ... पण त्यांची खरी ओळख मराठी चित्रपटातील अभिनयानेच बहरलेली दिसते ... बराच काळ खलनायक वा दृष्ट वृत्तीच्या भूमिका केल्यानं त्यांची ओळख खलनायक अशीच झाली पण त्यांनी मिळालेल्या प्रत्येक भूमिकेचं सोनं केलं ... त्य प्रत्यक्षात ते कमालीचे गंभीर प्रवृतीचे होते ... वाचनातून त्यांची मूळ प्रवृती अधिकच जपली होती ...
नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणाऱ्या निळूभाऊंचं ग्रामीण आणि शहरी जीवनाचं निरीक्षण अतिशय अचूक होतं ... या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने उपयोग केला... सहज , सुंदर अभिनय करणाऱ्या निळूभाऊंनी काल्पनिक कथेतला कलाकार जिवंत केला...
निळू फुले यांना अनेक पुरस्कार मिळाले त्यात महाराष्ट्र शासनातर्फे अभिनयासाठी सलग ३ वर्षे मिळाला ... साहित्य संगीत अकादमीचा पुरस्कार, 'सूर्यास्त' या नाटकाकरिता नाट्यदर्पण हा पुरस्कार... जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्कार आशा कितरी पुरस्काराचा त्यात समावेश आहे ... निळूभाऊ यांचं १३ जुलै २००९ रोजी निधन झालं ...अन एक अभिनयाचं विद्यापीठ कायमचं नजरेआड गेलं ...
- यशवन्त भंडारे
No comments:
Post a Comment