नायगाव येथील मनोहर भिडे यांची सभा रद्द करा - जिल्हाधिकाऱ्याकडे फुले आंबेडकर क्रांती मंच ची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 12 July 2023

नायगाव येथील मनोहर भिडे यांची सभा रद्द करा - जिल्हाधिकाऱ्याकडे फुले आंबेडकर क्रांती मंच ची मागणी


जयवर्धन भोसीकर 

 नांदेड : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मनोहर भिडे  यांचे नायगाव येथे १४ जूलै २०२३ रोजी सभा होणार आहे. अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, एसपी कार्यालय नांदेड यांच्याकडे फुले शाहू आंबेडकर क्रांती मंचावतीने निवेदन सादर करण्यात आले.

       दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की ती सभा रद्द करण्यात यावी कारण भिडे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करतो. त्यांच्या वक्तव्याने किंवा त्यांच्या कृतीने भाषणाने भीमा कोरेगाव दंगल घडली असा आरोप आहे. महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडण्याचा या पुर्वी प्रयत्न झाला तसेच माझ्या मळ्यातील आंबे खाल्याने महिलांना मुलं होतात असे करीत समस्त महिलांचा अवमान केला होता. तसेच जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही, तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज होऊ शकत नाही  तसेच १५ ऑगस्ट हे स्वातंत्र्य दिन नाही तर ते फाळणी दिन आहे त्या दिवशी भारतीयांनी उपाशी पोटी राहून दुखवटा पाळला पाहिजे असे देशद्रोही वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांची बैठक व सभा रद्द करण्यात यावी.  कारण अशा बैठका मधून व सभेमधूनच काही युवकाचे माती भडकावुन देशद्रोह व दोन समाजात तेड निर्माण करणारे वक्तव्य अशा बैठकीमधून करीत असल्यामुळे ती बैठक व सभा रद्द करण्यात यावी. अन्यथा ही सभा व बैठक उधळून लावण्यात येईल. व त्यामध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास त्या संपूर्ण प्रकरणास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील याची नोंद प्रशासनाने घ्यावी असेही निवेदनाद्वारे म्हटले आहे .

    यावेळी फुले शाहु आंबेडकर क्रांतीमंचचे प्रमुख भास्कर भेदेकर , नागसेन जिगळेकर, संदीप उमरे ,प्रकाश होन सांगळे गोस भाई रामतीर्थकर, सुनील कांबळे, इंद्रजीत डुमणे, निळकंठ तरटे, यांच्यासह अदी उपस्तीत होते.

No comments:

Post a Comment

Pages