शिवसेना पक्षप्रमुख मा.ऊद्ववजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शिक्षक सेनेच्या वतीने वृक्षारोपण पंधरवाडा साजरा होणार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 12 July 2023

शिवसेना पक्षप्रमुख मा.ऊद्ववजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शिक्षक सेनेच्या वतीने वृक्षारोपण पंधरवाडा साजरा होणार

जयवर्धन भोसीकर विशेष प्रतिनिधी

नांदेड :

 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री सन्मा. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दि.13 ते 27 जुलै (प्रेरणा दिन) शिववृक्षारोपणाचा वृक्षारोपण पंधरवाडा महोत्सव साजरा करण्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने ठरविले आहे.

 महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रांताध्यक्ष सन्माननिय श्री ज.मो. अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून होणारा हा वृक्षारोपन प्रेरणा दिन राज्यातील सर्व विभागातील सर्व जिल्हे व तालुका स्तरावरील सर्व शिक्षक सैनिक या वृक्षारोपण(प्रेरणा दिन) अभियानात सहभागी होऊन वृक्षारोपन करणार आहेत.  

     *मा.उध्दवजी ठाकरे साहेब स्वतःनिसर्ग तथा वृक्षमित्र आहेत. सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून कुठे पाऊस जास्त तर कुठे पडत नाही म्हणुन नियमित पाऊस पडण्यासाठी आणि प्राणवायू मिळण्यासाठी,पर्यावरण संतुलित राहण्यासाठी वृक्षारोपण करणे नितांत आवश्यक आहे. दरवर्षी माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या जन्म दिवसा निमित्त,राज्य मराठवाड्यासह,नांदेड जिल्ह्यात हजारो वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. मा.ऊद्धवजी ठाकरे स्वतःपर्यावरण प्रेमी तथा वृक्षमित्र आसल्यामुळे यांचा वाढदिवस वृक्षारोपण पंधरावडा(प्रेरणा दिन)म्हणून साजरा करण्यात येत आहे.

         प्रस्तुत वृक्षरोपण उपक्रम  शाळा,महाविद्यालय,मोकळी जागा,शेतातील बांधावर,डोंगरमाथ्यावर,ग्राम पंचायत,नगरपालीका,महानगर पालीकेच्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण केले जाते.हे अभियान मागील 3वर्षापासून आहे.  दिनांक 13 ते 27 जुलै  2023 हे पंधरा दिवस हे वृक्षारोपण पंधरावाडा दिन (प्रेरणा दिन) म्हणुन साजरा होणार आहे.

तरी या उपक्रमात शिक्षक सेना बंधू आणि भगिनी यांनी सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष श्री विठुभाऊ चव्हाण,मराठवाडा अध्यक्ष गोविंद काळे मराठवाडा सचिव बालासाहेब राखे सर,सहसचिव,विठ्ठल देशटवार,श्रीरंग बिरादार नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री संतोष अंबुलगेकर,खाजगी सेना जिल्हा अध्यक्ष श्री तानाजी पवार, जिल्हा सरचिटणीस रविंद्र बंडेवार,मनोहर भंडेवार, गंगाधर कदम, जिल्हा सरचिटणीस प्रा.परशुराम येसलवाड,गंगाधर ढवळे सर,अनिरुद्र शिरसाळकर,सुकन्या खांडरे,पुरुषत्तम मोतेवार,सचिन रामदिनवार,बळी शिंदे,मुस्तफा शेख,शिवाजी पाटील,बालाजी राजुरे,अविनास चिद्रावार,प्रकाश कांबळे,राजू पवार,संजय मोरेचंद्रकांत तम्मलवार,वसंत सिरसाठ यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages