किनवट :
मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ, अंबाडी द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा, ता. किनवट जि. नांदेड यांच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्य सामाजिक न्याय दिन व शालेय जीवनातील महत्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्याच्या भावी वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या 10 वी व 12 वी परीक्षेतील गुणवंताचा व वैद्यकीय प्रवेशास पात्र विद्यार्थी तसेच त्यांच्या पाल्यांचा सत्कार समारंभ दिनांक 04 जुलै रोजी सकाळी 11 वाजता गोकुंदा स्थित गोपिकिशन मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.
यावेळी मंचावर कार्यक्रम अध्यक्ष मा. भिमराव केराम, आमदार किनवट माहूर व प्रमुख पाहुणे मा. नेहाताई भोसले-सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी, किनवट, मा. डॉ. मृणाल जाधव तहसीलदार, किनवट, मा. शंकर साबरे नियोजन अधिकारी, किनवट, मा.राजीव शेळके- सहाय्यक प्रकल्पाधिकारी, किनवट, मा. नागनाथ चटलेवाड-सहाय्यक प्रकल्पाधिकारी, किनवट, मा. मनोज टिळे सहाय्यक प्रकल्पाधिकारी, शिक्षण किनवट, मा. धनंजय उरकुडे-पालक अधिकारी. मि.शि.प्र.मं. अंबाडी संस्थेचे सचिव मा. अभि प्रशांत ठमके, कोष्याध्यक्षा मा. शुभांगीताई ठमके, गोकुंदा ग्रा.पं. उपसरपंच मा.शेख सरुमाई, माजी न.पा अध्यक्ष आनंद मच्छेवार मा. संदीप केंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरच्या हस्ते महापुरुषाच्या प्रतिमाचे दीप-धूप-पूष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर संस्थेचे सचिव मा.अभि प्रशांत ठमके व कोष्याध्यक्षा मा. शुभांगीताई ठमके यांनी मान्यवराचे शाल- पूष्पहार देवून स्वागत केले. कार्याक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा.शेख हैदर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात मा. शेख हैदर यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावत जात आहे याचे सविस्तर विवरण केले.
या सत्कार संगारभात संस्थेच्या सलंग्न असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय, गोकुंदा, महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा, मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मेडीयम स्कुल कोठारी, महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, घोटी, मातोश्री कमलताई ठमके माध्यमिक विद्यालय सुभाषनगर, किनवट, मातोश्री कमलताई ठमके उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा या मधील 10 वी 12 वी परीक्षेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवणारे गुणवंत, वैद्यकिय प्रवेशास पात्र गुणवंत व एस. एस. सी. गणित विषयात 100 पैकी 100 मार्क घेणारे गुणवंत व विशेष सत्कार म्हणून आदिवासी आदिम जगातील कोलाम समाजातील 10 वी इंग्रजी माध्यमातील 02 गुणवंत विद्यार्थ्यांनी अशा 54 विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पाल्यांचा सत्कार शाल, पुष्पहार व ग्रंथभेट देवून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
प्रमुख पाहूणे म्हणून आपले मनोगत मांडत असतांना मा. डॉ. मृणाल जाधव, तहसीलदार .किनवट यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त, सदाचार अभ्यास करण्याची जिद्द व बिकट परिस्थितीला सामोरे जाण्याचे गुण अंगीकारले पाहीजे.जेणे करूण आपले ध्येय साध्य करता येईल असा मौलीक संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
अध्यक्षिय समारोप करताना मा. आमदार भिमराव केराम यांनी विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना सांगीतलेली माऱ्याच्या व मोक्याच्या जागा काबिज करा या प्ररेणादायी शब्दांची आठवण करून दिली. तसेच किनवट सारख्या आदिवासी भागात ठमके दामपत्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून जे कार्य करत आहे ते वाखण्याजोगे आहेत असे गौरवोद्गार काढले. तसेच हा गुणवंताचा सत्कार सोहळा घडवून आणला याबद्दल महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
सदरील कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन पर्यवेक्षक प्रा. संतोषसिंह बैसठाकूर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील व कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या समारंभास मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, विद्यार्थीनी, परिसरातील नागरीक व विविध वृत्तपत्रातील पत्रकार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment