अजितदादा गटाला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा जाहीर पाठिंबा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 25 July 2023

अजितदादा गटाला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा जाहीर पाठिंबा

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)- येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस छत्रपती संभाजीनगर च्या शहर जिल्ह्यातील विद्यार्थी काँग्रेस पदाधिकारी यांनी,महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे, महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा अशी ओळख असलेले, दमदार नेतृत्व, प्रभावी व्यक्तिमत्व, सर्वसामान्य जनतेसाठी झटणारे, शेतकरी, शिक्षण, रोजगार, आरोग्य, स्त्री व सर्व वंचित बहुजन घटकाला सोबत घेऊन आग्रही भूमिका घेणारे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार यांना जाहीर पाठिंबा दिल्याचे शहर जिल्हाध्यक्ष सौरभ मगरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, या पाठिंब्याच्या पत्रावर सौरभ मगरे,अजिंक्य खरात,साहिल मगरे, गोविंद ईघारे, अनुप मोरे, धम्माशील कांबळे, भूषण कलावंत, आकाश  कासारे, राहुल बारवाल, विशाल काळे, प्रशिक घोरपडे, प्रसाद होळकर, योगेश थोरात, मंगेश कपाळे, अभिषेक गवई.व इतर विद्यार्थी पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages