जयवर्धन भोसीकर, नांदेड :
गेल्या तिन दिवसापासुन होत असलेल्या सततच्या मुसळधार पाऊसामुळे नांदेड जिल्हात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे आर्थिक आणि अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकर्यांना पुर्णपणे आर्थिक मदत करण्यासाठी सामाजीक कार्यकर्ते इंद्रजीत डुमणे गागलेगावकर यांनी एका निवेदनात साकडे घातले आहे.मुख्यमंञ्यांना दिलेल्या निवेदनात इंद्रजीत डुमणे यांनी स्पष्टपणे मागणी केलेली आहे की,सततच्या मुसळधार पाऊसामुळे सोयाबिन,कापुस,उडीद,मुग यासह अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.अती पाऊसामुळे ही पिके पिवळी पडु लागली आहेत तर नदी नाल्या काटावरील पिकांचे नुकसान झालेच यात जमीनी खरडुन कोवळी पिके नेस्तनाबुत झाल्याची परिस्तीती आहे .तेव्हा आपण संबंधीत विभागाला आदेशीत करुन तात्काळ मंचनामे करुन शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळवुन द्यावी अशी विनंती डुमणे यांनी निवेदनात केली आहे.
No comments:
Post a Comment