कामगारांच्या न्याय हक्कांसाठी राज्यव्यापी लढा उभारणार - युवराज बनसोडे ; रिपब्लिकन कामगार सेनेची राज्यस्तरीय बैठक उत्साहात संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 16 July 2023

कामगारांच्या न्याय हक्कांसाठी राज्यव्यापी लढा उभारणार - युवराज बनसोडे ; रिपब्लिकन कामगार सेनेची राज्यस्तरीय बैठक उत्साहात संपन्न

पुणे :

रिपब्लिकन सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशाने आज रिपब्लिकन कामगार सेनेची बैठक विश्रामगृह,पुणे येथे प्रदेशाध्यक्ष युवराज बनसोडे यांच्या अध्यक्षतेखालील उत्साहात संपन्न झाली. त्यात राज्यातील सत्तेच्या बाजारात कामगारांचे शेकडो प्रश्न प्रलंबित असून शासन प्रशासनाने कामगारांना वाऱ्यावर सोडले असल्याने कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण सुरू आहे कामगारांच्या न्याय हक्कांचा राज्यव्यापी लढा उभारण्यासाठी कामगारांनी रिपब्लिकन कामगार सेनेत सामील व्हावे असे आवाहन महाराष्ट्र प्रमुख युवराज बनसोडे यांनी या प्रसंगी केले.

यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे आनंदराज आंबेडकर साहेबांनी फोनवरून अभिनंदन करून कामगारांच्या प्रश्नावर मुंबई येथे राज्यव्यापी मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले आनंदराज आंबेडकर साहेबांच्या शुभेच्छा व मार्गदर्शनामुळे सर्व पदाधिकारी यांच्यात उत्साह संचारला असून कामगारांच्या प्रश्नावर शासन प्रशासनाला घाम फोडण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.

यावेळी मुंबई,नवी मुंबई,सोलापूर, कोकण ,रायगड,सातारा,विदर्भ,लातूर,औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, अकोला,अमरावती येथील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

तर महाराष्ट्र सचिव अरविंद पांडेय, प्रदेश उपप्रमुख सचिन निकम, अमित गायकवाड, आंबेडकरी गायक प्रेम धांदे, जगदीश कांबळे (JK), सुभाष शिंगे , विक्रम खरे, धम्मपाल भुजबळ, भारत गडेराव, गणेश रगडे, अनमोल सवई, शमशूद्दीन अन्सारी, ताजुद्दीन शौकत, मकरंद कांबळे,शैलेंद्र पवार,बाळासाहेब गायकवाड, संतोष अंकुद, सागर कोळी, रमेश अलकुटे, दयानंद गव्हाणे, भुजंग मोरे, चंद्रकांत माने, सलमान शेख, रामेश्वर खंदारे, शैलेंद्र चौगुले, दिलीप शिरामे, राजेश्वर चंदनशिवे, मनोज मेहेत्रे, अनिल सावंत, सचिन सोनवणे, विजय बेंडे, रामचंद्र खरात, मनोज कांबळे, सचिन भालशंकर, सिद्धार्थ दिवेकर यांच्यासह महाराष्ट्रातील विविध शहरातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघटन बांधणीसाठी लवकर जिल्हा-विभाग निहाय राज्यव्यापी दौरा करण्यात येणार असल्याचे युवराज बनसोडे यांनी जाहीर केले.No comments:

Post a Comment

Pages