नामांतर विरोधकांचा बिमोड करण्यासाठी विद्यापीठाच्या कारभारात लक्ष देण्याची गरज; अभिवादन प्रसंगी उपस्थितांच्या भावना - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 5 August 2023

नामांतर विरोधकांचा बिमोड करण्यासाठी विद्यापीठाच्या कारभारात लक्ष देण्याची गरज; अभिवादन प्रसंगी उपस्थितांच्या भावना

औरंगाबाद :  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य कामनीसमोर विद्यापीठाच्या नामांतरासाठी शहीद झालेल्या भीमसैनिकांना आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

दि.०४ ऑगस्ट १९७८ रोजी नांदेड येथील नामांतर शहिद पोचिराम कांबळे,शहीद जनार्दन मवाडे व नागपूर येथील पोलिसांच्या बेछूट गोळीबारात शहीद रतन मेंढे, शहीद किशोर भाकळे, शहीद अब्दुल सत्तार, शहीद शब्बीर हुसेन, शहीद अविनाश डोंगरे या शहिद भीमसैनिकांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कारभारात नामांतर विरोधकांची ढवळाढवळ सुरू असून विद्यापीठाच्या प्रतिमेला मालिन करण्यासाठी अश्या प्रवृत्ती टपलेल्या आहेत ह्या प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी सुशिक्षित युवकांनी विद्यार्थी चळवळीत सक्रिय होऊन विद्यापीठाच्या कारभारात लक्ष घालणे गरजेचे असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी देशातील मनुवादी सरकार वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे निर्माण करू पाहत आहेत त्या विरोधात लढा उभारणे काळाची गरज असल्याचे मत सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक दौलतराव मोरे यांनी व्यक्त केले.



तसेच प्राचार्य डॉ.शंकर अंभोरे, डॉ.अनिल पांडे, डॉ.संभाजी वाघमारे, यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

तर डॉ.मानेराव सचिन निकम, शाहीर मेघानंद जाधव, गुणरत्न सोनवणे,ऍड.अतुल कांबळे, विकास रोडे, नारायण खरात, सिद्धार्थ मोरे,अमोल घुगे, करुणाताई जाधव, दिशांत मोगले, सचिन जाधव, संजय लोंढे, नागसेन अटकोरे , आकाश अढागळे, योगेश काइंदे आदींसह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.


No comments:

Post a Comment

Pages