जयवर्धन भोसीकर
बिलोली(ता. प्र.) :
गत अनेक वर्षापासून शासनदरबारी स्मशानभूमी साठी जागा उपलब्ध होत नसल्या ने कार्ला खू. येथील ग्रामस्थांच्या वतीने क्रांती दिनी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
बिलोली तालुक्यातील कार्ला खू गावाचे १९८३ साली पुनर्वसन करण्यात आले.गावातील सार्वजनिक स्मशान भूमी ची जागा गावापासून दूर असल्याने अंत्यविधीसाठी मोठी हाल होतात.शासनाने गावाजवळ स्मशान भूमी साठी जागा उपलब्ध करून द्यावी हि मागणी घेऊन रिपब्लिकन सेनेचे बिलोली शहराध्यक्ष गंगाधर इबितकर यांनी सतत पाठपुरावा केला आहे.तहसीलदार पासून मंत्रालयापर्यंत जागेसाठी निवेदन देण्यात आले मात्र शासनाच्यवतीने कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही.मागणी पुर्ण होत नसल्याने कार्ला खू येथील ग्रामस्थांच्या वतीने गंगाधर इबितकार यांच्या नेतृत्वाखाली नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी सचिन गिरी, तहसीलदार श्रीकांत निळे, गटविकास अधिकारी रविराज क्षिरसागर यांना दिलेल्या निवेदनामध्ये केली आहे.यावेळी अलीम शेख, मेहबूब शेख,गौतम वाघमारे, सद्दाम शेख,मुखत्यार शेख, शुद्धोधन वाघमारे यांच्यासह कार्ला खू येथील ग्रामस्थ व रिपब्लिकन सेने च्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment