निकिता राजेंद्र सर्पे हिची एम.बी.बी.एस.साठी निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 7 August 2023

निकिता राजेंद्र सर्पे हिची एम.बी.बी.एस.साठी निवड


किनवट,ता.७ : शहरातील सिद्धार्थ नगरातील रहिवासी असलेले राजेंद्र गंगाधर सर्पे यांची कन्या निकिता राजेंद्र सर्पे ही एम. बी. बी.एस.साठी पात्र ठरली आहे. मुंबई येथील के.ई.एम.

  वैद्यकीय महाविद्यालयात निकिता सर्पे हिचा नंबर लागला आहे. लवकरच तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

   निकिता हिचे कौतुक करून तिला   तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस रिपाइं मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक, अॅड.मिलिंद सर्पे,पीरिपाचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे,प्रा.रविकांत सर्पे, उत्तम कानिंदे, रमेश मुनेश्वर, राजेश पाटील, सम्यक सर्पे,प्रा.सुबोध सर्पे, आदिंनी शुभेच्छा दिल्या आहेत.


No comments:

Post a Comment

Pages