साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा १०३ वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 1 August 2023

साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा १०३ वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

किनवट,ता.१ : साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती सोहळा मोठ्या उत्साहात आज(ता.१) सकाळी बसस्टँड जवळील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करून पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

  त्यानंतर माजी आमदार प्रदीपजी नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी उपस्थित अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली.


   याप्रसंगी सुधाकर भोयर जिल्हाध्यक्ष भाजपा, पोलिस निरीक्षक दीपक बोरसे, माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानिवार, माजी नगराध्यक्ष के. मूर्ती,माजी नगराध्यक्ष साजिद खान, रिपाइं चे दादाराव कयापाक, राष्ट्रवादीचे नागनाथ भालेराव, काँग्रेसचे अभय महाजन, भाजप चे स्वागत आयनेनिवार, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार, पीरिपाचे नेते विनोद भरणे, लक्ष्मीपती दोनपेलीवर, के. स्वामी, शंकर भंडारे धनाजी बसवंते, मारोती सुंकलवाड, भगवान मारपवार,अॅड.मिलिंद सर्पे, अॅड. हरि दर्शनवाड, अश्विन पवार, सूरज भालेराव, बालाजी बामणे,कपिल सातव,सुरेश जाधव,उत्तम कानिंदे, निखिल सरपे, मनोहर श्रीरामे, पत्रकार गोकुळ भवरे, मलिक चौहान, संतोष सिसले , किरण ठाकरे,राजेश पाटील,अॅड.सम्राट सर्पे,स्वप्निल भालेराव आदी मान्यवर व समाजाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 जयंतीच्या निमित्ताने कलावती ब्लड बॅंक, आदिलाबाद (तेलंगाना) यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आलेले होते. याप्रसंगी अनेक रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले.


No comments:

Post a Comment

Pages