चंद्रमणी पाटील यांची गळफास घेऊन आत्महत्या - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 29 September 2023

चंद्रमणी पाटील यांची गळफास घेऊन आत्महत्या

किनवट,ता.३०(बातमीदार): अंबाडी(ता.किनवट) येथिल चंद्रमणी माधव पाटील (वय ४५) या शेतकऱ्याने काल(ता.२९) सकाळी ६ वाजताचे दरम्यान घरातच गळफास लाऊन आत्महत्या केली. 

  अत्यल्प भूधारक आणि कर्जबाजारी असल्याने जीवनयात्रा संपवल्याचे सांगण्यात आले. गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले. किनवट पोलीसात आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याचे समजते. चंद्रमणी पाटील हे कर्जबाजारीपणाला कंटाळले होते. अत्यल्प भूधारक असल्याने आणि यावर्षीची सततची अतिवृष्ठीने पिकाचेही नुकसान झाले. आशा सर्वच बाबींना कंटाळून त्यांनी (ता.२९) सकाळी ६ वाजताचे दरम्यान राहत्या घरातच गळफास घेतला. गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या पार्थीवावर शवविच्छेदन प्रक्रिया पार पाडून प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.


No comments:

Post a Comment

Pages