दिवाळीच्या तोंडावर वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा ; नागरिकांत संताप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 10 November 2023

दिवाळीच्या तोंडावर वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा ; नागरिकांत संताप

 किनवट(प्रतिनिधी) :  ऐन दिवाळीच्या तोंडावर महावितरणच्या गलथान कारभारामुळे किनवट शहरासह तालुक्यात वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू आहे.  तासंतास खंडित वीज अन्‌ कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.                                               


     किनवट शहरासह तालुक्यात गेल्या महिनाभरापासून अनियमित वीज पुरवठा सुरू आहे. कोणतेही कारण न देता वीज खंडित करुन नागरिकांना वेठीस धरल्या जात आहे.  सकाळी पालिकेद्वारे पाणी पुरवठ्याच्या वेळीच दररोज वीज गुल होत असल्याने, रोजच्याच या पंचायतीला लोक वैतागले आहेत. वीज पुरवठा बंद होताच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वच कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी बंद होत असतात.  कार्यालयात खंडित वीज पुरवठ्याबाबत नोंद करुनही त्याची दखल घेतल्या जात नाही. महिन्याकाठी हजारो रुपयांची वीजबिले ग्राहकांच्या माथी मारूनही महावितरण सुरळीत वीज देण्यास असमर्थ ठरत आहे. काही अधिकारी, कर्मचारी स्थानिकचे असल्याने त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारीही वीज ग्राहकांच्या तक्रारींना सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत. दिवाळीचा सण तोंडावर असताना तासन्‌तास खंडित आणि अपुरा वीज पुरवठा होत असल्याने, नागरिक त्रस्त झालेले  आहेत.

No comments:

Post a Comment

Pages