संभाजीनगर :
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दीपावलीच्या पूर्व संध्येला छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 या राज्याभिषेक वर्षानिमिताने 15 हजार पणत्यांच्या साह्याने महाराजांची प्रतिमा साकारण्यात आली आहे.पैठण येथील आर्य चाणक्य विद्यामंदिर शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य अशी प्रतिमा शालेय मैदानात साकारण्यात आली.सोबतच 54 किलो फुले आणि 45 किलो रांगोळीच्या सहायाने 'दिव्य शिवोत्सव व राजमुद्रा' साकारण्यात आली होती.
याचवेळी भगव्या ध्वजाखाली शिव प्रतिमासमोर 350 तोफांची (फटाक्यांची) सलामी देण्यात आली.शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारण्यासाठी 15 हजार पणत्या, 105 लिटर तेल, 30 हजार वाती, 54 किलो फुले, 45 किलो रांगोळ आणि 8 बाय 16 चा भगवा ध्वज तयार करण्यात आला.महाराजांची प्रतिमा तयार करण्यासाठी स्वतः विद्यार्थ्यांनी 5 हजार पणत्या जमवल्या होत्या.
विशेष शाळीय विद्यार्थ्यांनी अवघ्या 22 मिनटात 15 पणत्या लावल्याचे पाहायला मिळाले.तर, तब्बल 2 एकर परिसरात पंधरा हजार पणत्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी प्रतिमा साकारली गेली आहे.
No comments:
Post a Comment