दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंचे नांदेड मध्ये प्रदर्शन व विक्री - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 5 November 2023

दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंचे नांदेड मध्ये प्रदर्शन व विक्री


नांदेड :

सुनीत शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड संचलित एस.एम निवासी संमिश्र अपंग तांत्रिक प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र बरडशेवाळा तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी (अपंग,मतिमंद,मूकबधिर, अंध) दीपावली निमित्त आकर्षक असे दिवे व मेणबत्त्या आपल्या हाताने तयार केलेले आहेत. त्यांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री दिनांक 8 नोव्हेंबर 2023 ते 10 नोव्हेंबर 2023 वेळ सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत नांदेड शहरातील रोहित हॉटेलच्या समोर मेन रोड श्रीनगर येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

तरी नांदेड जिल्ह्यातील व शहरातील सर्व नागरिकांनी दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनास भेट देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलेला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मा. आर.आर.भास्करे व सचिव मा. प्रवीणकुमार आर. भास्करे तसेच कार्यशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक व कर्मचारी यांनी केलेले आहे..


No comments:

Post a Comment

Pages