भीम महोत्सवात "आंबेडकरी विचारधारेचा निष्ठावान" पुरस्काराने मंगेश कदम सन्मानित - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 10 November 2023

भीम महोत्सवात "आंबेडकरी विचारधारेचा निष्ठावान" पुरस्काराने मंगेश कदम सन्मानित


नांदेड, जयवर्धन  भोसीकर :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्त आयोजित भीम महोत्सव कार्यक्रमात महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्याचा  गौरव करण्यात आला आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश कदम यांचा "आंबेडकरी विचारधारेचा निष्ठावान"

हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला

शहरातील कुसुम सभागृहात 7 नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्त भीम महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन प्रा. प्रबुद्ध चित्ते यांनी केले होते.

 आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख  दीपक कदम सर, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष  कामाजी पवार सर यांच्या हस्ते शिवसेनेचे एसी, एसटी,ओबीसी मागासवर्गीय विभागाचे जिल्हा प्रमुख मंगेश कदम यांच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन मंगेश कदम यांना  "आंबेडकरी विचारधारेचे निष्ठावान " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

याप्रसंगी  समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त  शिवानंद मिनगिरे,उद्योजक बालाजी इबितवार सर, प्राचार्य शेखर घुंगरवार सर , शास्त्रज्ञ डॉ सिद्धार्थ जोंधळे सर, श्री अजय तुरेराव सर - सहाय्यक राज्यकर आयुक्त यवतमाळ, संवाद अभ्यासिकेचे शंकर शिंगे सर, स्वागताध्यक्ष डॉ.दिनेश निखाते यांची उपस्थिती होती. मंगेश कदम यांनी कोरोनाच्या काळात गरजूना धान्य वाटप, अन्नदान वाटप,रक्तदान शिबीरे , विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप, गरीब विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप, विविध भागात स्वखर्चाने अनेक नगरामध्ये वाचनकट्टे, गोरगरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मोफत पुस्तके वाटप , व्यसनमुक्ती,हुंडाबंदी, स्त्री भ्रूण हत्या या विषयावर जनजागृती व्हावी यासाठी सत्यपाल महाराज, संदीप पाल महाराज, यांचे समाजप्रबोधनाचे कार्यक्रम विविध भागात गावात आयोजित करणे, गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय मदत, या सह अनेक समाज उपयोगी उपक्रम मंगेश कदम मित्र मंडळाच्यावतीने संबंध जिल्ह्यात राबविण्यात येतात. त्त्यांच्या कार्याचे कौतुक  कामाजी पवार राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ यांनी केला, ते भावी आमदार आहेत,त्यांनी लवकर आमदार व्हावेत अशा शुभेच्छा पण त्यांनी दिल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिनानिमित्त आयोजित भीम महोत्सव कार्यक्रमास मोठया संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

No comments:

Post a Comment

Pages