नांदेड : बहुजन युथ पँथर नांदेड जिल्हा आयोजित २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त संविधान गौरवम होत्सवास हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. नांदा (भैसापट्टी ) ता.भोकर जि.नांदेड याठिकाणी सायंकाळी ६ : ०० वाजता वार रविवार रोजी संविधान गौरव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन युथ पँथरचे संस्थापक अध्यक्ष भाईसाहेब जाधव तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ पँथर नेते एल.ए.हिरे तर अध्यक्षस्थानी डॉ.एस.एस.वाठोरे यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून विविध संघटना व क्षेत्रातील मान्यवरांनी यांची उपस्थिती लाभली होती.
या कार्यक्रमात संविधानाची प्रस्ताविकाचे सामुदायिक वाचन करुन कार्यक्रमांची सुरूवात करण्यात आली. पुढे बोलतांना ते म्हणाले की आज संविधनाविषयी जनजागृती करण्यात आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. तर या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष बहुजन युथ पँथरचे जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्तरे हे होते व महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांच्या बुद्ध व भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला. यावेळी जाधव पुढे बोलताना म्हणाले, की "भारतातील सर्व जाती धर्माचे उध्दारकर्ते हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत". सदरील कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी सुर्यकांत पाटोळे,सागर ससाणे, विक्रांत बिऱ्हाडे, संतोष जाधव, बालाजी चव्हाण,रमेश हैबते,सचिन खंडेलोटे, अक्षय गायकवाड, लक्ष्मण मोरे, संजय डोंगरे, दिलीप जगमे,बुद्धिवान एडके,राहुल धमसे,अल्मास शेख, ज्ञानेश्वर मानेबोनवाड,आनंद पाटील,सुनील पाटील, महेश लिमकर,वाल्मीक मानेबोनवाड,गंगाधर यमलवाड, शाम लोखंडे, कपिल चंद्रे,लखन एडके,सूर्यकांत जगमे, हनमंत कदम,महेंद्र धमसे,धम्मपाल धमसे, रत्नपाल ऐडके,बालाजी माजरे, प्रकाश भुसेवाड,नवनाथ बोयवारे, राजू दोतरे,शंकर आलवाड सह आदीनी परिश्रम घेतले.सदरील कार्यक्रमाचे आयोजन बहुजन युथ पँथर नांदेड चे जिल्हा संघटक अमोल धमसे यांनी केले होते.
No comments:
Post a Comment