हिमायतनगर येथे पान शॉप दुकानांवर कारवाई करून 10 हजार 96 रुपये किंमतीचा गुटखा जप्त ; अन्न व औषध प्रशासनाची विभागाची कारवाई - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 29 November 2023

हिमायतनगर येथे पान शॉप दुकानांवर कारवाई करून 10 हजार 96 रुपये किंमतीचा गुटखा जप्त ; अन्न व औषध प्रशासनाची विभागाची कारवाई


नांदेड,  दि. 29 :- अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने 28 नोव्हेंबर रोजी हिमायतनगर शहरातील विविध पान शॉप दुकानाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत एकुण 5 पान शॉप दुकानातून गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू इत्यादी 10 हजार 96 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.

 

हिमायतनगर येथील प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्रेते शुभम रामु नरवाडे, पवन चंद्रकांत ढोणे वय 23 वर्षे, प्रताप गल्ली, हिमायतनगर, रामदास नारायण रच्चेवार, वय 54 वर्षे, कलीका गल्ली, हिमायतनगर, तानाजी शिवाजीराव ढोणे वय 33 वर्षे, प्रताप गल्ली, हिमायतनगर , पुरवठादार बाबुराव शिंदे, हिमायतनगर व शेरु, चौपाटी, हिमायतनगर मे. इम्रान  पान शॉप, परमेश्वर मंदीर समोर, हिमायतनगर जि. नांदेड चा मालक इम्रान यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26 (1), 26 (2) (iv), 27 (3) (d), 27 (3) (e) व 30 (2)(अ) चा भंग करुन शिक्षापात्र कलम 59 अन्वये तसेच भा.द.वि.चे कलम 34,188,272,273,328 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

 

हिमायतनगर   येथील मे. इम्रान पान शॉप, परमेश्वर मंदिर समोरील दुकानाचा मालक व विक्रेता इम्रान याने प्रतिबंधित अन्न पदार्थ प्रकरणी कायदेशिर कारवाई करीत असताना शासकीय कामात अडथळा केला म्हणून त्यांचे विरुध्द कलम 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नांदेड कार्यालयातील सहायक आयुक्त सं.ना.चट्टे, सहायक आयुक्त रा.मा. भरकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आर.पी. पाटील, सं.वि.कनकावाड, स.सु.हाके, ऋ,र. मरेवार व अ.भ.भिसे यांच्या पथकाद्वारे घेण्यात आली आहे असे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त रा. मा. भरकड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


No comments:

Post a Comment

Pages