किनवट ता. (बातमीदार) : निम्मं पैनगंगा धरण व धरणग्रस्त भागातील जमिनीचे भूसंपादन रद्द करण्याच्या मागणी निवेदन किनवट - माहूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रदीप नाईक आणि विदर्भ- मराठवाडा निम्मं पैनगंगा धरण विरोधी समितीच्या शिष्टमंडळाने विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार सचिन अहेर, आमदार रोहित पवार यांची विधानभवनात भेट देऊन निवेदन दिले. आणि त्यांच्याशी चर्चा करून हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. यावेळी विदर्भ- मराठवाडा निम्म पैनगंगा धरण विरोधी समितीचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील, जगताप उपाध्यक्ष मुबारक तवर , कोषाध्यक्ष प्रल्हादराव गावंडे, गोंड आदिवासी अखिल भारतीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद पेंदोर उपस्थित होते.
निम्मं पैनगंगा धरणामुळे ९५ गावे बाधित होणार असून अंदाजे दीड लाख शेतकरी वर्गाचे तसेच शेतीवर अवलंबून असलेल्या नागरिकांचे व मजुरांचे मोठ्या प्रमाणात विस्थापन होईल. तसेच ५० हजार एकर सुपीक जमीन आणि २५ हजार वन जमिनीच्या जमिनीवरील पशूपक्षांचे कायमस्वरूपी नुकसान होणार आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होईल.
बहुतांश लोकांची शेती व शेतीवरील आधारित व्यवसाय हे प्रमुख उदरनिर्वाहाचे साधन आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन कायमचे नष्ट होणार असून शेतकरी मजूर वर्ग कायमचा देशोधडीला लागणार आहे. त्यामुळे लोकांच्या होणाऱ्या घटनात्मक मूलभूत अधिकारांची पायमल्ली थांबवून नियोजित धरण कोणत्याही परिस्थितीत करू नयेत तसेच जमिनीचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया तत्काळ थांबवण्यात यावी असे निवेदनात म्हटले जाते.
चितळे समितीचा अहवाल प्रकल्प विरोधात
सुमारे ९५ गावांपैकी ४२ गावे ही पेसा क्षेत्रातील असून त्या सर्व गावातली ग्रामसभांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. शासनाने नेमलेल्या चितळे समितीचा अहवाल या प्रकल्पाच्या विरोधात आहे. तरी देखील शासनाने हा प्रकल्प पूर्ण करण्याचा तगादा सुरु केला आहे.
किनवट : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि आमदार रोहित पवार यांना निम्मं पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचे निवेदन देताना माजी आमदार प्रदीप नाईक, धरण विरोधी समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप, उपाध्यक्ष मुबारक तंवर, कोषाध्यक्ष प्रल्हादराव गावंडे, सल्लागार, अॅड. बालाजी येरावार
No comments:
Post a Comment