नांदेड दि. 14 -
आगामी काळात होणार्या सर्वच निवडणुका ह्या ईव्हीएम मशीनद्वारे न घेता त्या मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात, अशी मागणी महाविहार परिवाराच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
आगामी काळातील सर्वच निवडणुका ह्या ईव्हीएम मशीनद्वारे न घेता त्या मतपतिकेद्वारे घेण्यात याव्यात. ईव्हीएम मशीनमध्ये नवीन तंतज्ञाद्वारे छेडछाड करून निवडणुकांचा निकाल बदलता येतो, असा समज देशातील सर्वच मतदारांमध्ये झाला आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीनवरील मतदारांचा विश्वास उडालेला आहे. परवा झालेल्या राजस्थान, मध्यप्रदेश. छत्तीसगड, तेलंगणा या राज्यातील निवडणुकांचे निकाल प्रसारमाध्यमांनी सर्वेक्षणाच्या आधारे एक अमुक पक्ष बहुमताने सर्वच राज्यांमध्ये सत्तेवर येईल, असे सर्वेक्षणात म्हटले होते. परंतु रातोरात या निवडणुकांचे निकाल अंदाजाच्या विरुद्ध लागले. त्यामुळे ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करता येते, असा मतदारांचा समज झाला आहे. तसेच अनंत केरबाजी भुरे मागील 14 दिवसांपासून छत्रपती संभाजी नगर येथील आयुक्त कार्यालयासमोर ईव्हीएम मशीन ऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात या मागणीसाठी आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएम हटाव देश बचाव, मतपत्रिकेद्वारेच निवडणुका झाल्याच पाहिजेत, अशा घोषणा देण्यात आल्या.
या निवेदनावर भीमराव हटकर, इंजि. भारत कानिंदे, रमेश दुधमल, साहेबराव पुंडगे, हिरामण वाघमारे, टी.पी. वाघमारे, रोहिदास कांबळे, डॉ. गौतम कपुरे, सदाशिव गच्चे, राजेश बिर्हाडे, भैय्यासाहेब गोडबोले, गौतम बहादरे, अशोक कांबळे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
No comments:
Post a Comment