अजित पवार राजीनामा द्या ; विद्यापीठात विद्यार्थी संघटना , प्राध्यापक संघटना व संशोधक विद्यार्थ्यांकडून जोरदार आंदोलन ; पीएच. डी बाबतच्या वादग्रस्त वक्तव्याचा चप्पल, बुटावर फोटो चिटकवून निषेध - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 14 December 2023

अजित पवार राजीनामा द्या ; विद्यापीठात विद्यार्थी संघटना , प्राध्यापक संघटना व संशोधक विद्यार्थ्यांकडून जोरदार आंदोलन ; पीएच. डी बाबतच्या वादग्रस्त वक्तव्याचा चप्पल, बुटावर फोटो चिटकवून निषेध

संभाजीनगर :

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवार (दि. १२) रोजी पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांबाबत 'पीएचडी करून करून काय दिवे लावणार आहेत??" असे वादग्रस्त वक्तव्य केले. 

या वक्तव्याचा सर्व स्थरातून होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात या विरोधात गुरुवार (दि.१४ ) रोजी दुपारी 11 वाजता विविध विद्यार्थी, प्राध्यापक संघटना व पीएचडी संशोधक यांच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर (वाय कॉर्नर) येथे जोरदार आंदोलन करण्यात आले.

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य हे संशोधक विद्यार्थ्यांचे खच्चीकरण करणारे असून या वक्तव्यातून अजित पवार यांनी स्वतःचे अज्ञान स्पष्ट केले असून. अजित पवार हे अर्थ खात्याच्या माध्यमातून बहुजनांचे खच्चीकरण करत आहेत, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या पैशात तरी घोटाळा करू नये अश्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

तर अजित पवार हे भ्रष्ट, विश्वासघाती आहेत, पैसे व सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष फोडल्याचा देखील आरोप विद्यार्थ्यांनी केला, धरणात लघुशंका करण्याचे वक्तव्य व सिंचन घोटाळ्याचा देखील या आंदोलनाच्या घोषणेत समावेश होता. फेलीशीप साठी 200 विद्यार्थ्यांची मर्यादा तात्काळ उठविण्यात यावी, मागेल त्याला संशोधनासाठी फेलोशिप देण्यात यावी हेच अजित पवार यांचे प्रायश्चित्त ठरेल असे मत उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

यावेळी अजित पवार यांचा पक्ष व त्यांचे सहकारी पक्ष यांना मतदान न करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.

यावेळी डॉ.शंकर अंभोरे, प्रा.उमाकांत राठोड, डॉ.देवानंद वानखेडे, सचिन निकम, गुणरत्न सोनवणे,डॉ.कुणाल खरात, नारायण खरात, संदिप तुपसमुद्रे, ऍड.अतुल कांबळे,भागवत चोपडे,भीमराव वाघमारे, लोकेश कांबळे, दीक्षा पवार, मानव साळवे,विकास रोडे,अर्जुन मोरे,एकनाथ तिरमले,किरण धाटे, गौतम साळवे,अक्षय जाधव,रवी व्हावळे,सचिन भुईगळ,मनीषा बल्लाळ,पल्लवी बोराळकर, निशिकांत कांबळे आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


आंदोलनात स्वाभिमानी ,बामुक्टो,रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी,सम्यक विद्यार्थी आंदोलन, एस एफ आय,एम आय एम विद्यार्थी आघाडी,  सत्यशोधक विद्यार्थी संघटना,एन एस यु आय आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

No comments:

Post a Comment

Pages