औरंगाबाद : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे एकमेव सुपुत्र यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती रिपब्लिकन सेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
रिपब्लिकन सेनेचे पूर्व जिल्हाध्यक्ष प्रा. सिद्धोधन मोरे यांच्या वतीने उस्मानपुरा येथील मनपा शाळेत सुमारे 100 विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक के व्ही मोरे हे होते.
प्रदीप त्रिभुवन, भन्ते बुद्धपाल, सचिन शिंगाडे, रामराव नरवडे, रामराव आढाव, सखुबाई शिंगाडे, विकास हिवराळे,गुलाब जाधव, शेषराव दाणे, अनुप तायडे, प्रदिप मिसाळ,अजय मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तर डॉ.आंबेडकर विधी महाविद्यालय, नागसेनवन येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष किशोर जोहरे यांनी भैयासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकताना धम्माची चळवळ परिपक्व करण्याचे काम भैय्यासाहेब यांनी केले, सगळे पुढारी स्वार्थ साधण्याचे काम करत असताना बौद्धांच्या सवलतीसाठी भैयासाहेबांनी आंदोलन उभारले, चैत्यभूमी चे निर्माण कार्य, भूमीहीनांचा लढा, बौद्ध धम्माच्या प्रचाराची धुरा सांभाळताना त्यांनी मोठे पणाचा आव न आणता कार्यकर्ता म्हणून काम केले रिपब्लिकन ऐक्यासाठी सतत प्रयत्न करत स्वाभिमानी कार्यकर्त्यांची पिढी घडवली असे प्रतिपादन केले. तर प्राचार्य डॉ.प्रमोद हिरोडे, चंद्रकांत रुपेकर,प्रा.सिद्धोधन मोरे, रमेश बनसोडे, सचिन निकम, मुख्याध्यापक धन्यकुमार टिळक यांनी अभिवादन पर भाषण केले तर अध्यक्षस्थानी मराठवाडा अध्यक्ष मिलिंद बनसोडे हे होते.
आयोजक काकासाहेब गायकवाड यांनी प्रास्ताविक केले तर बबन साठे यांनी सूत्रसंचालन केले व सुनील पांडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल कानडे, अशोक गवळे,नानासाहेब सूर्यवंशी,अस्कर खान, अजय बनसोडे, योगेश दाणे, के एस पवार, भीमराज त्रिभुवन, के जी पवार, विनोद वाकोडे, साईराज गवळे, अमोल बनसोडे, रंजनाताई साठे, शोभाताई भालेराव, आशाताई गायकवाड, साबेरा आपा, ताराबाई बनसोडे पुनम ठाकुर, चंदा जाधव पुष्पाताई साठे,आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment