नांदेड :
आंबेडकरवादी मिशन सिडको नांदेड येथे रविवारी दि 17 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता राज्यस्तरीय मातंग समाज शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर चालणारे या परिषदेमध्ये मातंग समाजाच्या शैक्षणिक स्थितीचा आढावा घेऊन त्यांना विदेशातील उच्च शिक्षणाच्या दिशा, भारतातील सर्वोच्च शिक्षणाची दिशा, देशातील सर्व स्पर्धा परीक्षांची तयारीच्या संदर्भातील मार्गदर्शन, उद्योग, व्यवसाय, आयात निर्यात संदर्भातील मार्गदर्शन, शिक्षण हाच विकासाचा मूलमंत्र या विषयावर समाजातील विद्यार्थी व तरुणांचे प्रबोधन करण्यात येणार आहे.
21 देशाच्या आफ्रिकन युनियनचे सल्लागार डॉ. हरिभाऊ वाघमारे, डॉ. गोविंद नांदेड माजी शिक्षण संचालक, नंदन नांगरे माजी शिक्षण संचालक,डॉ. यशवंत चव्हाण, ऐश्वर्याची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, वैशाली हळदेकर एडलेड युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलिया,डॉ साळवे मंत्रालायाय, प्रीती जमदाडे मुख्य व्यवस्थापक dcb बँक,नीलम कांबळे मुख्य अधिकारी, डॉ.प्रो. अनंत राऊत,बालाजी थोटावे,गुणवंत काळे,एड. शिवराज कोळेकर, शिवा कांबळे, प्रा. विनोद काळे, प्रदीप रोडे, दिगंबर मोरे,विजय रणखांबे लसकाम,एम गवाले आदी मन्यावर विध्यार्थी तरुणांना मार्गदर्शन करतील. दिवसभर चालणाऱ्या परिषदेचे आयोजन आंबवडकरवादि मिशन करत आहे. या कार्यक्रमांस उपस्थित राहून मातंग समाजातील विदयार्थीनी शिक्षण, विदेशी शिक्षण, उदोग व्यापार दिशा घावी असे आवाहन दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादि मिशन यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment