नव्या वर्षात युपीआय पेमेंटमध्ये मोठे बदल, जाणून घ्या कोणते ? - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 27 December 2023

नव्या वर्षात युपीआय पेमेंटमध्ये मोठे बदल, जाणून घ्या कोणते ?


दिल्ली :

देशात यूपीआयचे युजर्स ४० कोटींच्या घरात असून, यूपीआयद्वारे २०२३ या वर्षात १६ लाख कोटींपेक्षा जास्त व्यवहार झाले आहेत. २०२३ या वर्षात यूपीआयद्वारे सायबर गुन्ह्यांमध्ये ३० हजार कोटी रुपयांच्या रकमेची चोरी झालेली आहे. येत्या ३ वर्षांत यूपीआयचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असून, व्यवहार १०० बिलियन डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. सायबर गुन्ह्यांत यूपीआयद्वारे चोरी केलेली रक्कम मोठी असल्यानेच आरबीआयनं नियम आणखी कठोर केले आहेत.

 

आरबीआयचे यूपीआयच्या नियमांतील ९ महत्त्वाचे बदल


- जीपे, फोन पे, पेटीएम, भीम अॅप फोनमध्ये इन्स्टॉल केलेले असून, जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत या अॅपचा तुम्ही एकदाही वापर केला नसल्यास १ जानेवारी २०२४ पासून तुमचा यूपीआय आयडी ब्लॉक करून सुरक्षिततेच्या कारणास्वत तात्पुरत्या स्वरूपात बंद केला जाणार आहे.


- दररोजची यूपीआय व्यवहार करण्याची मर्यादा १ लाख रुपयांपर्यंत असणार आहे.


- शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयात एका दिवसासाठी ५ लाख रुपयांपर्यंत फी किंवा रक्कम भरणे शक्य होणार आहे.

- २ हजार रुपयांपेक्षा जास्त सेटलमेंट व्हायचे असेल तर आता चार तास लागणार आहेत. आरबीआयनं सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी हा बदल केलेला आहे. उदा. व्यवहार झाल्यानंतर लगेचच विक्रेत्याच्या अकाऊंटला पैसे जमा व्हायचे, पण आता जानेवारी २०२४ पासून तुम्ही कोणत्याही नवीन व्यक्ती किंवा दुकानदाराला २ हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम यूपीआय केल्यास तर विक्रेत्याच्या अकाऊंटला ती रक्कम जमा होण्यासाठी चार तास लागणार आहेत. परंतु तुम्ही त्या व्यक्ती किंवा दुकानदाराला नेहमीच पेमेंट करत असाल तर हा नियम तुम्हाला लागू होणार नाही.


- यूपीआयद्वारे तुम्ही नवीन व्यक्ती किंवा दुकानदाराला पेमेंट केले तर चार तासांच्या आता तुम्ही ते कॅन्सल करू शकणार आहात. तसेच ती रक्कम पुन्हा तुमच्या अकाऊंटला जमा होणार आहे. याचा मोठा फायदा सायबर गुन्हेगारांना चोरलेली रक्कम परत मिळवण्यासाठी होणार आहे. चुकून दुसऱ्याच्या अकाऊंटला पैसे गेल्यास आता परत मिळू शकणार आहेत.


- आता विक्रेत्याचं खरं नाव समोर येणार आहे. सिम कार्ड कोणत्याही नावानं असलं तरी बँक अकाऊंट ज्या नावाने असेल तेच नाव यूपीआय पेमेंट करायच्या वेळी तुम्हाला पाहायला मिळणार आहे.


- आता तुम्ही बँकेला विनंती करून बॅलन्स रकमेपेक्षा जास्त रक्कम खर्च करू शकता. तुमची बँक ट्रॅक रेकॉर्ड किंवा सिबिल कोर्स तपासून तुम्हाला ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे.


- यूपीआय एटीएमसाठी आरबीआयनं जपानच्या हिताशी कंपनीबरोबर भागीदारी केलेली आहे. तसेच ही यूपीआय एटीएम मशिन्स सगळीकडे उपलब्ध होणार आहेत. जसं की, डेबिटकार्डाद्वारे आपण एटीएममधून पैसे काढतो, आता तशाच पद्धतीनं 

एटीएम मशिनमध्ये क्यूआर कोड स्कॅन करून तुम्हाला पैसे काढता येणार आहेत.


- यूपीआय वॉलेटमधून पेमेंट केल्यास १.१ टक्के सर्व्हिस चार्ज द्यावा लागणार आहे.


No comments:

Post a Comment

Pages