जीवनदीप महाविद्यालयात एकदिवसीय राज्यस्तरीय इतिहास परिषदेचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 27 December 2023

जीवनदीप महाविद्यालयात एकदिवसीय राज्यस्तरीय इतिहास परिषदेचे आयोजन

कल्याण :

जीवनदीप शैक्षणिक संस्था ही ग्रामीण, आदिवासी भागात उच्च शिक्षणाची संधी निर्माण करून देणारी शैक्षणिक संस्था आहे. श्री रविंद्र नारायण घोडविंदे यांनी या शैक्षणिक संस्थेची उभारणी केली असून कल्याण मुरबाड, शहापूर या तालुक्यात संस्थेची शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, विधी महाविद्यालये ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. जीवनदीप महाविद्यालय गोवेली हे सन २००४ मध्ये सुरू झालेले कल्याण ग्रामीण भागातील नॅक मूल्यांकन प्राप्त दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे महाविद्यालय आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांना कला, क्रीडा व सांस्कृतिक आदी सर्वच क्षेत्रातील संधी या महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली आहे. संशोधनाला चालना देणारे अनेक राष्ट्रीय, विद्यापीठ स्तरीय चर्चासत्रे, कार्यशाळा, परिषदांचे यशस्वी आयोजन महाविद्यालयाने केले आहे.

       याचाच एक भाग म्हणून या वर्षी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व  अश्वमेध प्रतिष्ठान तर्फे गोवेली येथे राज्यस्तरीय इतिहास परिषदेचे आयोजन  "ग्रामदेवता व स्थानीय देवता: सांस्कृतिक परंपरा" या मुख्य विषयाच्या अनुषंगाने दि 6 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या वेळी बीजभाषक म्हणून डॉ अरुण ढेरे(अध्यक्ष डॉ. रा. चिं ढेरे संस्कृती-संशोधन केंद्र) , तज्ज्ञ वक्त्या डॉ. प्राची मोघे(सहाय्यक प्राध्यापक पुरातत्त्व विभाग मुंबई विद्यापीठ) ,परिषदेचे अध्यक्ष श्री रविंद्र  घोडविंदे(अध्यक्ष जीवनदीप शैक्षणिक संस्था) मार्गदर्शक म्हणून डॉ. विजय कुलकर्णी(प्राचार्य ज्ञानदीप महाविद्यालय खेड) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.या परिषदेत  स्थापना व ऐतिहासिक संदर्भ, वैशिष्टपूर्ण रूढी व परंपरा, जत्रा व उत्सव, उपचार व विधी, लोकसमजुती व लोककथा, ठाणे जिल्ह्यातील ग्रामदेवता व स्थानीय देवता या उप विषयावर शोधनिबंध सादर करण्यात येणार आहे व हे शोधनिबंध UGC Care Listed  Journal मध्ये Imapct Factor & ISSN क्रमांक असलेल्या जर्नलमधून प्रकाशित केला जाणार आहे .तसेच या परिषदेमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी फोटोग्राफी , रीलस व पोस्टर मेकिंग या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या परिषदेला सर्वांनी मोठ्या उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेयाचे आयोजक अविनाश हरड,दिव्या ठाकूर,स्थानिक सचिन प्राचार्य डॉ.के.बी कोरे उपप्राचार्य, हरेंद्र सोष्टे ,समन्वयक प्रा. कविता काटकर सह समन्वयक प्रा.राजाराम कापडी यांनी केले.

No comments:

Post a Comment

Pages